गार्गी आणि आराध्याला एकेरीची अजिंक्यपदे; मनस्वीला दुहेरी मुगुट

ठाणे जिल्हा बॅडमिंटन स्पर्धा

ठाणे: जागतिक महिला दिनानिमित्त ठाणे शहर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनने आयोजित केलेल्या विशेष बॅडमिंटन स्पर्धेत मनस्वी चौहानने 17 वर्षांखालील आणि 19 वर्षांखालील एकेरीमध्ये विजेतेपद मिळवत दुहेरी मुगुट मिळवला. तसेच, गार्गी मोहिते आणि आराध्या मोहिते या सख्या बहिणींनी आपापल्या वयोगटातील एकेरीमध्ये अजिंक्यपद मिळवले.

खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत विविध वयोगटातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आणि कोर्टवर आपल्या खेळाची चमक दाखवली. मिनी गर्ल्स एकेरीत ९ वर्षांखालील गटात गार्गी मोहिते विजेती तर आर्या शर्मा उपविजेती ठरली. ११ वर्षांखालील गटात शनाया तवते विजेती तर आर्या शर्मा उपविजेती ठरली. तर १३ वर्षांखालील गटात आराध्या मोहिते विजेती तर इलियाना राजेश उपविजेती ठरली.

गर्ल्स एकेरीत १५ वर्षांखालील गटात सनाया ठक्कर विजेती तर अश्विका नायर उपविजेती ठरली. १७ वर्षांखालील गटात मनस्वी चौहान विजेती तर धनवी नायर उपविजेती ठरली. १९ वर्षांखालील गटात मनस्वी चौहान विजेती तर चैतन्य शेट्टी उपविजेती ठरली.

महिला एकेरीत आर्या कोरगावकर विजेती तर ईशा पाटील उपविजेती ठरली. महिला दुहेरीत नंदिनी पंड्या आणि श्रेया भल्ला विजेत्या तर प्रीती मुरुडकर आणि आर्या दातार उपविजेत्या ठरल्या. ४५ वर्षांवरील महिला दुहेरीत प्रतिमा सितानी आणि मनिषा प्रधान विजेत्या तर माधुरी पाटील आणि गीतांजली आपटे उपविजेत्या ठरल्या.

स्पर्धेच्या समारोप प्रसंगी एका भव्य बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. श्रीमती शशी सिंग या उपस्थित होत्या. त्यांनी विजेत्यांना बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देऊन त्यांचा गौरव केला आणि महिला खेळाडूंना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शुभेच्छा दिल्या. डॉ. सिंग यांनी महिलांना खेळात सहभागी होण्याचे आणि त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करण्याचे आवाहन केले.
ठाणे शहर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत वाड यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “महिला खेळाडूंनी दाखवलेली ऊर्जा आणि उत्साह पाहून आम्हाला खूप अभिमान वाटतो.