मोफत चाचणी, मोफत उपचार; आजारी रुग्णांना भाजपचा आधार

शेकडो ठाणेकरांनी घेतला शिबिराचा लाभ

ठाणे : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या समन्वयाने व कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड.निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने, ठाण्यात मोफत सामुदायिक आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

रस्ते, वीज, शिक्षण, सुरक्षा यांसारख्या सर्व महत्त्वाच्या क्षेत्रात विकासाभिमुख उपाययोजना राबवत असताना, नागरिकांचे आरोग्य देखील अत्यंत महत्त्वाचे आहे हे महायुती सरकार जाणते. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात सर्वत्र अशी आरोग्य शिबिरे भरवण्यात येत आहे.
ठाण्यात आमदार ॲड.निरंजन डावखरे यांच्या नेतृत्त्वाखाली, मो. ह. विद्यालय येथे हा उपक्रम अत्यंत यशस्वीरीत्या राबवण्यात आला. ५६३ नागरिकांनी ह्या शिबिराद्वारे रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, नेत्र चिकित्सा यांसह तज्ञ डॉक्टर्सकडून रोग निदान, शिबिरानंतर आवश्यक रुग्ण शस्त्रक्रिया, रक्त व लघवी चाचणी व ई.सी.जी. तपासणी इत्यादी विनामूल्य सुविधांचा लाभ घेतला,

तसेच केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत योजनेद्वारे गरीब आणि वंचित नागरिकांना पाच लाखपर्यंतचे मोफत रुग्णालयीन उपचार प्रदान करण्याकरिता आयुष्मान कार्डचे वितरण करण्यात आले. तसेच मोफत नेत्रचिकित्से बरोबरच नागरिकांना विनामूल्य चष्म्यांचे वाटप देखील करण्यात आले.
सकाळी 8 वाजल्यापासून चालू असलेल्या ह्या शिबिराला ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. नागरिकांनी अत्यंत समाधानाने ह्या स्तुत्य उपक्रमकरिता मुख्यमंत्री सचिवालयाचे आभार मानले.

आमदार निरंजन डावखरे यांनी ह्या शिबिरात नागरिकांच्या सेवेसाठी दाखल झालेल्या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे प्रशस्तीपत्र देऊन कौतुक केले व आभार मानले. तसेच प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी, ठाण्यातील विविध भागात अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येईल. पुढील शिबिर कोपरी मंडल येथे भरविण्यात येईल, अशी माहिती देखील दिली.

यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री ॲड. माधवी नाईक, ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर, भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, कोकण पदवीधर प्रकोष्ठचे संयोजक सचिन मोरे, रमेश आंब्रे, मनोहर डुंबरे, नारायण पवार, सचिन पाटील, संदीप लेले यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.