ठाणे : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्रमार्फत महिलांनासाठी आर.जे. ठाकूर महाविद्यालय ठाणे येथे पाककला वर्गाची सुरवात करण्यात आली. महिलांना नवनवीन पदार्थ शिकता यावे व त्यातून अर्थार्जन करता यावे यासाठी संस्थे मार्फत ठाणे शहरात या उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत महिलांना भारतीय, चायनिज, कॅाटींनेटल, बेकरी प्रकारामधील अनेक पदार्थ शिकवले जाणार आहेत.
जिजाऊ संस्थे तर्फे ठाणे शहरात सामाजिक व कौशल्य विकसित करणार्या उपक्रमांचा झपाटा सुरू असून या आधी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत ठाण्यामध्ये आतापर्यंत विविध उपक्रम सुरु करण्यात आले आहेत. या प्रसंगी संस्थेच संस्थापक निलेश सांबरे, रा.ज. ठाकुर महाविद्यालयाचे अध्यक्ष श्रीमती ठाकूर, उपाध्यक्ष मंगेश ठाकूर, प्रियतमा मुथे, पोलीस निरीक्षक वागळे पोलीस स्थानक, डॅा. स्नेहा कोकाटे, रुपाली जाधव, आरती माने, किरण पवार, अश्विनी आंब्रे, सुप्रीया सावंत, किसन बोंद्रे, केदार चव्हाण, परेश कारंडे, संदीप धवडकर, अमीत राठोड, उमेश प्रधान, अमित महाडीक, महेश विशे, दिनेश घाडीगांवकर, संतोष गोपाळ आदी उपस्थित होते.