ठाणे: शहरातील नवीन कोरोना रुग्णांचा आकडा किं चित वाढला असून आज चार नवीन रुग्णांची भर पडली आहे तर एक जण कोरोनामुक्त झाला आह.े महापालिका क्षेत्रातील माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती परिसरात तीन आणि लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती भागात एक असे चार रूग्ण वाढले आहत. े उर्वरित सात प्रभाग समितीमध्ये एकही रूग्ण सापडला नाही.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी एक जण रोगमुक्त झाला आहे. आत्तापर्यंत एक लाख ८१,५५८ रूग्ण ठणठणीत बर होऊन घरी ग े ेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी १८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज एकही रूग्ण दगावला नसून आत्तापर्यंत २,१२७जणांचा मृत्यू झाला आह.े
महापालिका प्रशासनाने काल शहरातील ३३९ नागरिकांची कोरोना चाचणी घेतली होती. त्यामध्ये चार जण बाधित मिळाले. आत्तापर्यंत २४ लाख ८,१९८ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये एक लाख ८३,७०३रूग्ण बाधित सापडले.