ठाणे : शहरातील नवीन कोरोना रूग्ण किंचित वाढले आहेत. आज चार रूग्ण सापडले आहेत तर सात जण कोरोनामुक्त झाले आहेत. सलग १४ दिवसानंतर कळवा येथे एक रूग्ण सापडला आहे.
महापालिका हद्दीत सर्वाधिक तीन रूग्ण माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात वाढले आहेत. एका रुग्णाची भर कळवा येथे झाली तर इतर सात प्रभाग समिती क्षेत्रात शून्य रुग्णांची नोंद झाली आहे.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार सुरू असलेल्या रूग्णांपैकी सात जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८१,४३३ रूग्ण बरे होऊन घरी परतले तर रुग्णालयात आणि घरी ६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सुदैवाने आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील ६२३ नागरिकांची चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये चार जण बाधित मिळाले आहेत. आत्तापर्यंत २३ लाख ९२,८२८ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८३,६२३जण बाधित सापडले आहेत.