आगीत होरपळून चार म्हैशी गतप्राण तर दोन गायी जखमी

वीज पडून जनावरांच्या गोठ्याला आग

शहापूर : तालुक्यातील खैरे गावात 9 जूनच्या रात्री 11 वाजता देसले यांच्या जनावरांच्या गोठ्यावर वीज पडून गोठ्याला आग लागली. या आगीत गोठ्यात बांधून ठेवलेल्या चार म्हैशी जागीच मरण पावल्याने या शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

9 जून 2024 रोजीच्या रात्री झालेला मुसळधार पाऊस व विजेच्या गडगडाटामध्ये खैरे येथील अरुण दिनकर यांच्या बेडे घरावर वीज पडून आग लागून चार दुभत्या म्हैशी होरपळून मरण पावल्या. तसेच आगीमध्ये तीन ते चार हजार रुपयांचा पेंढा व एक बैलगाडी जाळून खाक झाली. तसेच दोन गायी जखमी झाल्या.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोक प्रतिनीधींनी घटनास्थळाची पाहणी करून संबंधित अधिकारी वर्गाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देऊन पीडित कुटूंबाला आर्थिक मदत दिली.