गुलमोहराचे झाड पडून पाच महागड्या गाड्यांचे नुकसान

ठाणे: श्रीरंग सोसायटीमधील एका इमारतीजवळील गुलमोहराचे भलेमोठे झाड पडले. हे झाड रस्त्यावर पार्क केलेल्या पाच वाहनांवर पडले असल्याने वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

ठाण्यातील श्रीरंग सोसायटीजवळ जुने गुलमोहरचे झाड आज दुपारी २ च्या सुमारास कोसळले. सुदैवाने दुपारी या रस्त्यावर वर्दळ नसल्याने कोणालाही दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच ठाणे पालिकेच्या वृक्षप्राधिकरण विभागाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी पिकअप वाहनासह व अग्निशमन दलाचे जवान रेस्क्यू वाहनासह तत्काळ उपस्थित होते. यामध्ये वंदना पारकर, अजय शेलार, कौस्तुभ गुप्ते आणि संजय पेटकर यांच्या चारचाकी वाहनांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने झाड कापून बाजूला करण्यात आले.