अरुंद गल्ली-बोळातील आगीवर नियंत्रण आणण्यासाठी उपयुक्त
मुरबाड : राज्याच्या आप्पत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागाकडून नगर पंचायतीस अग्निशमन सुसज्ज असे रॉयल इंफिल्डमेंट बुलेट वॉटर मिस्टफायर एक्सटिंग्युशर मोटार बाईक अँड कॉम्प्रेस्ड एअर फोम फॉर्म बाईक वितरीत करण्यात आली आहे.
केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत मुरबाड नगर पंचायतीस घनकचरा वाहतुकीसाठी दोन घंटागाड्या, एक मोठा ट्रॅक्टर, दोन लहान ट्रॅक्टर वितरीत करण्यात आले असून आमदार किसन कथोरे, नगराध्यक्ष व नगर पंचायत, सर्व सदस्य यांच्या प्रयत्नाने वाहन व्यवस्था मुरबाड नगर पंचायतीस नागरीकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. या आधुनिक साधनाच्या मदतीने मुरबाड शहर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यासाठी हातभार लागणार आहे.
नगर पंचायतीमार्फत यापैकी लहान ट्रॅक्टरवर फवारणी यंत्र बसविण्यात आले असून या वाहनाद्वारे शहरात औषध फवारणी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे यामुळे अपुऱ्या मनुष्यबळाअभावी फवारणीस लागणारा कालावधी कमी होऊन संपूर्ण शहरात चांगल्या प्रकारे औषध फवारणी करणे शक्य होणार आहे. परिणामी रोगप्रतीबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवून नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल.
मुरबाड नगरपंचायतीकडे अग्निशमन व आणीबाणी विभागाकडे एक मोठे अग्निशमन वाहन नागरीकांच्या सेवेसाठी कार्यरत आहे. परंतु ज्या ठिकाणी फायर ब्रिगेडच्या फायर टेंडरच्या गाड्या पोहचू शकणार नाही अशा अरुंद रस्ते गल्लीबोळातील जागी पोहचू शकत असल्याने शहराची आपत्कालीन यंत्रणा अधिक सक्षम व बळकटीकरण झाली आहे.
२ ऑगस्ट २०२४ रोजी मुरबाड नगरपंचायत कार्यालयासमोर संबंधित कर्मचारी यांनी वाहनावरून प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले असून त्यावेळी मुरबाड नगर पंचायतीचे नगराध्यक्ष मुकेश विशे, मुख्याधिकारी मनोज म्हसे, आरोग्य समिती सभापती संतोष चौधरी तसेच मानसी देसले उपनगराध्यक्षा, मधुरा सासे, दीक्षिता वारघडे, स्नेहा चंबवने, रवीना राव, मोनिका शेळके, नम्रता तेलवणे, विनोद नार्वेकर, नितीन तेलवणे, अर्जुन शेळके, अक्षय रोठे, मोहन गडगे व नागरिक तसेच कार्यालयीन सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वाहनांचा लोकार्पण सोहळा झाला.