‘अ‍ॅप’मुळे पावणे दहा लाखांची आर्थिक फसवणूक

ठाणे : कोटक क्लब-411 या ग्रुपमध्ये ‘अ‍ॅड’ करून ‘बल्क कोटक अ‍ॅप’ डाऊनलोड केल्यानंतर ‘अ‍ॅप’मुळे 9 लाख 73 हजार 416 रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना घडली आहे.

उल्हासनगर-3 येथील 14 जून ते 16 ऑगस्ट 2024 रोजी पावेतो ही घटना घडली. फिर्यादी राजेंद्र ढमाले (43) शांतीनगर येथे राहतात. त्यांना अनोळखी मोबाईलधारक व व्हॉटस्अ‍ॅपधारक व्यक्तींनी कोटक क्लब-411 या ग्रुपमध्ये अ‍ॅड करून ‘बल्क कोटक एल’ हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले आणि त्याव्दारे शेअर्स मार्केट ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतविल्यास अधिक नफा मिळण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादींना संबंधित अ‍ॅपमध्ये एकूण 9 लाख 73,416 रुपये ऑनलाईन भरण्यास भाग पाडले व रक्कम देऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे.

या प्रकाराबाबत फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात मोबाईलधारक महिला आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश सांवत हे करीत आहेत.