संघर्ष समितीची खारभूमी विभागाकडे मागणी
ठाणे : कळवे येथील खारभूमीवर राजकीय आशिर्वादाने भूमाफियांनी कब्जा सुरु के ला आहे. या भूमाफियांवर गुन् दाखल करावेत, हे अशी मागणी संघर्ष कृ ती सेवा संस्थेचे संस्थापक दशरथ पाटील यांनी खारभूमी विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अभियंता स्मिता घोडेस्वार यांना निवेदन देताना के ली.
कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आव्हाड यांनीही खारभूमी विभागाने लेखी तक्रार के ल्यास भूमाफियांवर गुन्हा नोंदवू असे स्पष्ट के ले. दशरथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली, भूमाफियांच्या जमीन कब्जेविरोधात शासन-प्रशासनाला जागे करण्यासाठी व खारभूमीवरील शेतकऱ्यांचा हक्क अबाधित राखण्यासाठी सोमवार १८ एप्रिल रोजी, कळवे येथील खारभूमी विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर शेकडो भूमिपूत्र शेतकऱ्यांनी तीव्र निदर्शने के ली. “महाराष्ट्र सरकारचा निषेध असो, भूमिपुत्र शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो, भूमाफियांवर कारवाई करा” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. याप्रसंगी नगरसेवक उमेश पाटील, गजानन पवार, राकेश पाटील, मनोज पाटील, सिकं दर के णी, वसंत पाटील, दशरथ म्हात्रे, नंदा पवार, कृ ष्णा भगत, रवी पाटील, रचना पाटील, रवींद्र कोळी आदींसह शेकडोंच्या
संख्येने भूमिपूत्र शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार १९८५ साली खारभूमी जमीन पाटबंधारे विभागाच्या नावे हस्तांतरित करण्यात आली तर २०१२ साली या खारभूमीचे विविध संस्थांना वाटप करण्यात आले. जमीनीवर दोन वर्षात वहिवाट करुन वापर करण्याची शासकीय शर्थ-अट १० वर्षानंतरही मोडल्यावरही सदर विविध संस्थांच्या नावे सदर जमीन आहे. ही बाब बेकायदेशीर आहे. आता मनिषा नगर, गणेश विद्यालय, शिवदर्शन बिल्डींगच्या मागील बाजुने तसेच मुंबई- पुणे रोड, दत्तवाडी पूर्वेकडील रेल्वे व रस्त्यालगत भूमाफियांनी वाॅल कं पाऊं ड व बांधकाम करुन खारभूमीच्या जागेवर अतिक्रमण के ले आहे. या भूमाफीयांकडून मनिषानगरच्या बाजूने चाळी बांधल्या जात आहेत. हे शासनाच्या डोळ्यादेखत घडत असूनही दर्ल ु क्ष होत असल्याने राजकीय आशिर्वादाने भूमाफियांनी धुमाकु ळ घातला आहे. या भूमाफियांवर कारवाईसाठी व शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी निदर्शने करण्यात आल्याचे दशरथ पाटील यांनी सांगितले.
भूमिपूत्रांच्या खारभूमीवर अतिक्रमण करणाऱ्या या भूमाफियांवर शासन-प्रशासनाने जर १० मे पर्यंत कारवाई न के ल्यास व भूमिपूत्र शेतकऱ्यांना न्याय न दिल्यास २५ मे पासून मुंबई येथील आझाद मैदानात प्राणांतिक उपोषण करणार असल्याचा इशाराही दशरथ पाटील यांनी दिला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री
अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री एकनाथ शिंदे, जयंत पाटील, स्थानिक आमदार व गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भूमिपूत्रांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे आणि पोलीस विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे महापालिका व खारभूमी विभाग यांची संयुक्त बैठक आयोजित करून शेतकऱ्यांचा खारभूमीचा प्रश्न सोडवावा असे आवाहनही पाटील यांनी के ले आहे.