दस्त नोंदणी करणेही शक्य
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील आणि अन्य जिल्ह्यांतील शेतक-यांसमोर मुला व मुलींचे शिक्षण, लग्न अशा प्रसंगी पैशांची एकदम उभारणी कशी करायची असा प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे लहान-लहान तुकडे पाडून जमीन विकणे अवघड होत होते तर काही ठिकाणी शेतीचे तुकडे पाडून आर्थिक व्यवहार केले जात होते.
जमिनीचे लहान-लहान तुकडे होऊ नयेत यासाठी राज्यामध्ये तुकडे बंदी कायद्याच्या तरतुदीनुसार बागायती शेतीसाठी 20 गुंठे आणि जिरायती जागेसाठीही 40 गुंठे असे तालुकानिहाय प्रमाणभूत क्षेत्र निश्चित झाले होते. परंतु ठाण्यासह अन्य जिल्ह्यांमधील असंख्य शेतक-यांसमोर मुला व मुलींचे शिक्षण आणि लग्न अशा महत्वाच्या प्रसंगी पैशांची उभारणी एकदम कशी करायची असा प्रश्न निर्माण उद्भवल्यामुळे लहान -लहान तुकडे पाडून जमीन विकणे अवघड झाले होते. काही ठिकाणी शेती-बागांचे तुकडे पाडून व्यवहार केले जात होते.
मात्र, अशा तुकड्यांची दस्त नोंदणी होत नव्हती आणि परिणामी खरेदी-विक्रीविना शेतकरी अडकून पडत होते. त्यांना अनेकदा पैशांचा व अन्य अडचणींचाही सामना ‘ओल्या डोळ्यांनी’करावा लागत होता. अशी वेळ कोणत्याही शेतकर-यांवर येता कामा नये, त्यामुळे ‘तुकडा बंदी कायदा उठवावा’ अशी जोरदार मागणी संबंधित जमीनधारकांनी केली होती.
अखेर त्या ‘गणिता’चा राज्य सरकारने सकारात्मक विचार केला आणि आता तुकडे बंदी कायद्यात अंशत: फेरबदल करून अधिसूचनांद्वारे वीस गुंठे जिरायती आणि दहा गुंठे बागायती जमिनीची खरेदी आणि विक्री करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, राज्य शासनाचा नवा निर्णय केवळ ग्रामीण भागाकरीता लागू राहणार आहे. सर्व महापालिका, सर्व नगरपालिका, सर्व नगरपरिषद हद्दीत येणा-या जमिनींसाठी हा निर्णय लागू राहणार नाही
राज्य सरकारने तुकडा बंदी कायद्यात बदल केला असला तरी तो ग्रामीण भागातील शेतजमिनींसाठी असणार आहे. हा निर्णय महापालिका, नगर परिषदा, नगरपालिका हद्दीसाठी लागू होणार नाही. थोडक्यात यातून शहरी भागाला वगळण्यात आले आहे, अशी माहिती शासनाच्या वरिष्ठ अधिका-याने दिली. जमीन असूनही शेतक-याला लग्न किंवा शिक्षणासाठी जमिनीचा तुकडा पाडून किंवा विकता येत नव्हती. आता मुला-मुलींच्या लग्नाच्या प्रसंगी किंवा आदी कारणांसाठी जमिनीचा तुकडा पाडता येणार आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे जमिनीचे तुकडे पाडण्यात सुसूत्रीकरण आले असून शेतकरी यांना आणि जमीनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती शासकीय अधिकारी यांना सूत्रांनी दिली.