डोंबिवली : आमदार रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून कृषी विभाग आत्मा व कृषी पणन पुरस्कृत विंग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि., डोंबिवलीकर प्रतिष्ठान आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीत विविध ठिकाणी आठवडी बाजार भरवण्यास सुरुवात झाली आहे.
दर गुरुवारी रिजन्सी इस्टेट, बिल्डिंग नं. २२ जवळ, दर शुक्रवारी ठाकुर्लीतील म्हसोबा चौक, ९० फिट रोड येथे; दर शनिवारी रिजन्सी अनंतम कॉम्प्लेक्सच्या मेन गेट जवळ आणि दर रविवारी डोंबिवली पूर्वेतील नेहरू मैदान येथे हा दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत आठवडी बाजार भरवण्यात येत आहे.
बऱ्याचदा शहरातल्या मार्केटमध्ये जो भाजीपाला मिळतो, तो रासायनिक खतं आणि औषध फवारणी केलेला असतो. त्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका असतो. मात्र या आठवडी बाजाराच्या माध्यमातून डोंबिवलीकरांना शेतात पिकणारा नैसर्गिक आणि विषमुक्त ( रेसिड्यू फ्री ) ताजा माल थेट डोंबिवलीत विकत मिळत आहे. यामध्ये सर्व प्रकारचा, विशेषतः सेंद्रिय व विषमुक्त भाजीपाला, फळे, धान्य, कडधान्य इ. शेतमाल रास्त दरात मिळत आहे.
या उपक्रमामुळे डोंबिवलीकरांना रास्त दरात उत्तम दर्जाचा माल उपलब्ध होत आहे. त्यामुळे डोंबिवलीकरांचे आरोग्य जपण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असंच म्हणावं लागेल. पण त्याजोडीनेच दलाल-अडते यांचा कोणताही हस्तक्षेप नसल्याने शेतकऱ्यांना देखील अधिकचा भाव मिळत आहे अशा रीतीने डोंबिवलीतील हा आठवडी बाजार दुहेरी फायद्याचा ठरत आहे. रविंद्र चव्हाण यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की “शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे तसेच कृषी क्षेत्रातील दलाल-अडते यांचे महत्त्व कमी करणे यावर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी नेहमीच भर देत असतात. याच प्रेरणेतून उचललेले हे पाऊल आहे.”पोलीस, अमोल अहिरे – मीरा-भाईंदर पोलीस, सोनी भुरे – ठाणे शहर पोलीस, सोमनाथ हिंगमीरे-ठाणे ग्रामीण यांच्यासह विद्यार्थी विविध दलात तैनात झाले आहेत.