बबल टी याला पर्ल मिल्क टी, बबल मिल्क टी, tapioca मिल्क टी, बोबा टी किंवा बोबा ड्रिंक असेही म्हणतात. 1980 च्या दशकाच्या सुरुवातीस तैवानमध्ये या ड्रिंकचा शोध लागला. भारतात जसं चहा लोकप्रिय आहे तसच तैवानमध्ये बोबा ड्रिंक हे सर्वाधिक लोकप्रिय आहे.
बोबा ड्रिंकमध्ये दोन प्रकार असतात. सोडा बेस व मिल्क बेस. Tapioca pearl (बोबा) हा सर्वात सामान्य घटक आहे. Tapioca मध्ये मिसळलेल्या घटकांनुसार पर्लचा रंग बदलतो. बहुतेक pearls हे ब्राऊन शुगर पासून तयार करतात.
फ्रायकिंग
सध्याच्या काळात प्रत्येक गोष्ट ट्रेंड नुसार चालते. सध्या बोबा ड्रिंकचा ट्रेंड सगळीकडे पाहायला मिळत आहे. याचमुळे प्रत्येक कॅफे खवय्यांसाठी बोबा ड्रिंक्स सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत. ठाण्यात फ्रायकिंगने, नोव्हेंबर २०२३ रोजी या बोबा ड्रिंकची सुरुवात खवय्यांसाठी केली. बोबा ड्रिंकमध्ये खरेतर सोडा बेस व मिल्क बेस असे दोन प्रकार असतात. पण फ्रायकिंगमध्ये फक्त सोडा बेस बोबा ड्रिंक्स उपलब्ध आहेत. यामध्ये passion फ्रुट, किवी, बबलगम, लीची, वॉटरमेलन हे फ्लेवर फ्रायकिंगमध्ये उपलब्ध आहेत. ठाण्यात या बोबा ड्रिंकला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. फ्रायकिंग्सने ठाण्यात सर्वप्रथम सुरू केलेल्या बोबा ड्रिंक्सला ठाणेकरांनी डोक्यावर घेत जिभेवर मिरवले आहे.
पत्ता : शॉप क्र.3, महावीर माइलस्टोन, कॉम्रेड राजाराम विष्णू राऊल मार्ग, विकास कॉम्प्लेक्सच्या मागे, कोलबाड, ठाणे पश्चिम, 400601
बोबा फ्युजन
ठाण्यात बोबा ड्रिंक हे काहीतरी नवीन असल्यामुळे खूप लोकांना माहित नव्हते. त्यामुळे नागालँड येथे राहणाऱ्या Samlambe Poireng या तरुणाने ठाण्यात बोबा ड्रिंक हा प्रकार सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २६ नोव्हेंबर २०२३ रोजीठाण्यात बोबा फ्युजन हे शॉप सुरु केले. मलेशियामध्ये प्रवास करताना त्यांना हा बोबा टी चा शोध लागला आणि त्यांना बोबा टी चे अनोखे फ्लेवर्स आणि chewy बबल्स आवडले. जेव्हा ते भारतात परत आले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, हा प्रकार स्थानिक पातळीवर उपलब्ध नाही. त्यामुळे मिस्टर सॅम यांनी ठाण्यात बोबा टी खवय्यांसाठी सुरु केले. बोबा फ्यूजनमध्ये ५० पेक्षा जास्त प्रकारचे बोबा टी उपलब्ध आहेत. त्यांच्याकडे मेनूमध्ये मिल्क टी, फ्रूट टी, बबल लस्सी आणि क्लासिक बोबा टी समाविष्ट आहे. खवय्यांना त्यांच्या पेयामध्ये अतिरिक्त मजा आणि चव आणण्यासाठी टॅपिओका बोबा, पॉपिंग बोबा किंवा जेली बोबा सारखे विविध प्रकार उपलब्ध आहेत. या ड्रिंकला ठाणेकरांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बोबा फ्युजनला फूड ब्लॉगर्सचा देखील खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
पत्ता : दुकान क्र. 8, बी-विंग, सेंट्रम बिझनेस स्क्वेअर, रोड नंबर 16, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे ४००६०४
कोगो
बोबा टी हा प्रकार खवय्यांसाठी खूप वेगळा आणि नवीन पदार्थ आहे. ठाण्यातील खवय्यांना बोबा टी ची उत्कृष्ट चव घेता यावी म्हणून तीन मित्रांनी एकत्र येऊन कोगो या दुकानाची सुरुवात केली. कोगो येथे १८ वेगवेगळ्या प्रकारचे बोबा ड्रिंक उपलब्ध आहेत. जुलै २०२३ पासून कोगो मध्ये बोबा ड्रिंक सुरु केले. नवनीत सकपाळ, निपुण कोळी, देवेंद्र पवार या तिघा मित्रांनी हटके अशा बोबा ड्रिंकची सुरुवात ठाण्यातील खवय्यांसाठी कोगो या आपल्या कॅफेमध्ये सुरु केली. पाश्चिमात्य देशात मिळणाऱ्या या ड्रिंकचा आस्वाद भारतात देखील खवय्यांना घेता यावा या उद्देशाने त्यांनी कोगो येथे बोबा ड्रिंक सुरु केले.
पत्ता : दुकान क्रमांक ०७, वसंत विहार सर्कल, लोक उपवन, फेज २, ठाणे, ४००६१०