बेंगळुरू : कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे एक मोठा संशयास्पद स्फोट झाला, त्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला. बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये हा स्फोट झाला. या स्फोटात चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती बेंगळुरू पोलिसांनी दिली आहे.
बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवारी झालेल्या स्फोटात किमान चार जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. शहरातील राजाजीनगर येथील कॅफेच्या व्हाईटफिल्ड शाखेत दुपारी एकच्या सुमारास हा स्फोट झाला.
स्फोटाचे कारण अजुनही समजलेले नाही, दहशतवादी हल्ला असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. पोलिसांनी परिसराला वेढा घातला असून मदत आणि बचावकार्य सुरू होते.