ठाणे : महाविकास आघाडी सरकारने एसटी कामगारांचे शोषणच के ले आहे. शरद पवार यांचा पक्ष सत्तेत असल्यामुळे त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांनी याचा विचार करावा असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आं बेडकर यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात लगावला.
कोणाच्याही घरावर हल्ला करणे हे चुकीचेच असून याचा आम्ही निषेधच करतो, मात्र एसटी कामगारांची बाजूकोर्टात ज्या पद्धतीने मांडायला पाहिजे होती तशी मांडली गेली नाही, कोर्टाने एक संधी दिली आहे कामावर रुजू होण्याची, त्यामुळे आपला गिरणी कामगार होण्यापेक्षा एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहनही त्यांनी एसटी कामगारांना यावेळी के ली.
ठाणे ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने राष्ट्रपिता ज्योतिराव फु ले जयंती महोत्सवाचे आयोजन गडकरी रंगायतन नाट्यगृहात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. प्रकाश आं बेडकर पुढे म्हणाले, जेव्हा एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला तेव्हा आम्ही त्यांना पाठिं बा दिला होता, मात्र तेव्हाच आम्ही भूमिका मांडली होती की
तुमचा गिरणी कामगार होऊ देऊ नका, आता कोर्टाने संधी दिली आहे, उर्वरित प्रश्न नंतर सोडवता येतील मात्र आता कामावर रुजू होण्याचे आव्हान त्यांनी यावेळी के ले.
शिवनेरीच्या मार्फत ज्यावेळी खासगीकरण झाले तेव्हाच लढा द्यायला हवा होता, मात्र संपाबाबत जर कोर्टात योग्य बाजू मांडली असती तर जेवढं अभय कोर्टाने दिलं आहे आणखी अभय दिले असते असे आं बेडकर म्हणाले. वकिलांनी के वळ कोर्टात आपली बाजू मांडायची असते, रस्त्यावर बाजू मांडायची नसते, नेते आणि वकील अशा
दोन्ही भूमिका एकाच वेळी निभावता येत नसल्याची टीका त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आं बेडकर यांनी के ली. हनुमान चालीसा आणि मशिदीवरील भोंग्याच्या बाबतीत जे राजकारण सुरू आहे त्याचारून उद्या राज ठाकरे यांच्या सभेनंतरच आपण उत्तर देऊ असे प्रकाश आं बेडकर यांनी स्पष्ट के ले.