अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे पहीले झाईस व्हिजन सेंटर मुंबईत

ठाणे : अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून डोळ्यांसाठी तंतोतंत नंबरचा सर्वोत्तम चष्मा आणि फ्रेम उपलब्ध करून देणाऱ्या जगातील १५० वर्षे सर्वात जुन्या जर्मन कंपनीचे झाईस व्हिजन सेंटर मुंबईतील चेंबूर येथे डॉ.नितीन देशपांडे आणि सहकाऱ्यांनी सुरू केले आहे.

या सेंटरबाबत माहिती देताना डॉ.नितीन देशपांडे म्हणाले, दैनंदिन जीवनात ८० टक्के माहिती ही डोळ्यांच्या मदतीने मिळवली जाते. त्यामुळे डोळ्यांचे मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या डोळ्यांना तंतोतंत क्रमांकाचा चष्मा आणि चेहऱ्याला शोभेल अशी फ्रेम मिळणे हे देखील महत्त्वाचे आहे.
झाईस व्हिजन सेंटरमध्ये जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते. डोळे आणि चेहरा स्कॅन करून जगातील सर्वोत्तम ग्लास आणि फ्रेम ग्राहकांना दिली जाते.

या जर्मन कंपनीचे जगभरात फक्त ४० ते ५० सेंटर असून मुंबईतील हे पहिलेच सेंटर असल्याची माहिती डॉ. देशपांडे यांनी दिली.