या विश्वचषकात गुणतालिकेत खालच्या पाच संघांमध्ये सामील असलेले गतविजेत्या इंग्लंडने आतापर्यंत त्यांच्या चार सामन्यांपैकी फक्त एकच जिंकून निराशाजनक प्रदर्शन केले आहे. त्याचप्रमाणे १९९६ चे विश्वचषक विजेते श्रीलंका संघर्ष करत आहेत कारण त्यांनी देखील एक सामना जिंकला आणि तीन सामने गमावले आहेत. या सामन्यावर सर्वकाही अवलंबून असताना, इंग्लंड आणि श्रीलंका आपले सर्वोत्तम पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करतील. इथून प्रत्येक सामना दोन्ही संघांसाठी व्हर्च्युअल नॉक आउट आहे.
आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ चा २५ वा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात २६ ऑक्टोबर रोजी बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल.
इंग्लंड आणि श्रीलंका एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने
इंग्लंड आणि श्रीलंका यांनी १९८२ ते २०२१ दरम्यान एकमेकांविरुद्ध ७८ एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी इंग्लंडने ३८ जिंकले आहेत, श्रीलंकेने ३६ जिंकले आहेत, एक सामना टाय झाला आणि तीन सामन्यांचा निकाल लागला नाही. भारतात त्यांनी दोन एकदिवसीय सामने खेळले असून, दोन्ही सामने इंग्लंडने जिंकले आहेत. विश्वचषकात, इंग्लंडने श्रीलंकेविरुद्ध ६-५ अशी आघाडी घेतली असली, तरी त्यांच्या मागील चार सामन्यांमध्ये (२००७, २०११, २०१५ आणि २०१९) श्रीलंकेने इंग्लंडला हरवले आहे.
इंग्लंड | श्रीलंका | |
आयसीसी रँकिंग (एक दिवसीय क्रिकेट) | ६ | ७ |
एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने | ३८ | ३६ |
एक दिवसीय क्रिकेटमध्ये (भारतात) | २ | ० |
एक दिवसीय क्रिकेटमध्ये (विश्वचषकात) | ६ | ५ |
आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मधील इंग्लंड आणि श्रीलंकेची आतापर्यंतची कामगिरी
आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये इंग्लंड आणि श्रीलंका आपला पाचवा सामना खेळतील. दोन्ही संघांचे नशीब आतापर्यंत सारखेच कारण त्यांनी चारपैकी केवळ एक सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
सामना क्रमांक | इंग्लंड | श्रीलंका |
१ | न्यूझीलंडकडून ९ विकेटने पराभव | दक्षिण आफ्रिकेकडून १०२ धावांनी पराभव |
२ | बांगलादेशचा १३७ धावांनी पराभव | पाकिस्तानकडून ६ विकेटने पराभव |
३ | अफगाणिस्तानकडून ६९ धावांनी पराभव | ऑस्ट्रेलियाकडून ५ विकेटने पराभव |
४ | दक्षिण आफ्रिकेकडून २२९ धावांनी पराभव | नेदरलँड्सचा ५ विकेटने पराभव |
संघ
इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियम लिव्हिंगस्टन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, ब्रायडन कार्स, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स.
श्रीलंका: कुसल मेंडिस (कर्णधार), कुसल परेरा, पाथुम निसांका, लाहिरू कुमारा, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, महीष थीकशाना, दुनिथ वेललागे, कसून राजिथा, अँजेलो मॅथ्यूज, दिलशान मदुशंका, दुशान हेमंथा, चमिका करुणारत्ने.
दुखापती अपडेट्स
इंग्लंडचा डावखुरा मध्यमगती गोलंदाज रीस टोपली हा २१ ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याच्या गोलंदाजीच्या हाताच्या तर्जनीला फ्रॅक्चर झाल्यामुळे विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. टोपलीच्या जागी ब्रायडन कार्सने इंग्लंड संघात स्थान मिळवले आहे. श्रीलंकेचा उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज मथीशा पाथिराना देखील खांद्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. श्रीलंकेचा माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूजला पाथिरानाच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे.
खेळण्याची परिस्थिती
बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील सामना होणार आहे. हा दिवस-रात्र सामना असेल. या स्पर्धेतील दुसरा सामना हे ठिकाण आयोजित करेल. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने मागील सामन्यात ५० षटकात ३६७ धावा केल्या होत्या. हे भारतातील सर्वात लहान मैदानांपैकी एक आहे आणि आणखी एक धावांची मेजवानी येथे होऊ शकते.
हवामान
भरपूर सूर्यप्रकाशासह हवामान आल्हाददायक राहण्याची अपेक्षा आहे. दिवसभरात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. ढगांचे आच्छादन २% आणि १% पावसाची शक्यता असेल. उत्तर-ईशान्येकडून वारे वाहतील.
कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे
इंग्लंडचा डावखुरा सलामीवीर डेविड मलान याला संघाला चांगली सुरुवात करून देणे अपेक्षित आहे. त्याने चार सामन्यांत ४८ च्या सरासरीने आणि १०६ च्या स्ट्राईक रेटने १९२ धावा केल्या आहेत. या विश्वचषकात इंग्लंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज असलेल्या रीस टोपली दुखापतीमुळे स्पर्धेच्या बाहेर पडला असून, संघाच्या पुढील सर्वोत्तम गोलंदाजावर जबाबदारी असेल, जो आदिल रशीद आहे. या लेगस्पिनरने चार सामन्यांत सहा विकेट्स घेतल्या आहेत.
श्रीलंकेचा उजव्या हाताचा मधल्या फळीतील फलंदाज सदीरा समरविक्रमा हा या विश्वचषकात त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे ज्याने चार सामन्यांत ७७ च्या सरासरीने आणि १०३ च्या स्ट्राईक रेटने २३० धावा केल्या आहेत, ज्यात एका शतकाचा समावेश आहे. गोलंदाजांमध्ये, डावखुरा मध्यमगती गोलंदाज दिलशान मधुशंका चार सामन्यांत ११ बळी घेऊन त्याच्या संघासाठी सर्वाधिक यशस्वी ठरला आहे. नवीन चेंडूने त्यानी प्रभावित केले आहे.
आकड्यांचा खेळ
- जो रूटला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६५०० धावा पूर्ण करण्यासाठी ८२ धावांची गरज आहे आणि तो १००० विश्वचषकातील धावांपासून ७० धावा दूर आहे.
- जोस बटलरला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५००० धावा पूर्ण करण्यासाठी ९० धावांची गरज आहे
- कुसल मेंडिसला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३५०० धावा पूर्ण करण्यासाठी ६७ धावांची गरज आहे
- चरित असलंकाला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५०० धावा पूर्ण करण्यासाठी ७९ धावांची गरज आहे
सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: २६ ऑक्टोबर २०२३
वेळ: दुपारी २:०० वाजता
स्थळ: एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू
प्रसारण: स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार
(सर्व आकडेवारी ईएसपीएन क्रिकइन्फो वरून घेतली आहे)