मुंब्र्यात रिमोट वापरून वीज चोरी

ठाणे: वीज मीटरमध्ये फेरफार करून रिमोटद्वारे मीटर हळू चालेल असा प्रयत्न केलेल्या तीन व्यक्तींविरोधात मुंब्रा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

मुंब्रा येथील मलिक रेसीडेन्सी इमारतीत हा प्रकार घडला असून टोरेंट पॉवरच्या दक्षता पथकाने घातलेल्या धाडीत दोन घरांमध्ये वीजेच्या मीटरमध्ये फेरफार केल्याचे निष्पन्न झाले. त्यानी मीटरशी छेडछाड करून रिमोट कंट्रोल वापरून वीज बिल कमी करण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले. टोरेंट पॉवरच्या दक्षता पथकाने धाड घालून वीज चोरीचा हा प्रकार उघडकीस आणला. दोन घरांनी मिळून तब्बल साडेपाच लाखावर वीज चोरी केल्याचे तपासणीत निष्नन्न झाले. वीज कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये वीज चोरांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलीस पुढील तपास करीत आहेत. वीज मीटरमध्ये फेरफार करणे हा वीज कायदयानुसार गंभीर गुन्हा असून या प्रकरणी संबंधित व्यक्तीला अटक व दंड अशा कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असा इशारा टोरेंट पॉवर कंपनीने दिला आहे.