निवडणुका पावसाळा झाल्यावरच

ठाणे: ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची सुप्रिम कोर्टात सुरू असलेली सुनावणी तीन आठवडे पुढे ढकलण्यात आल्याने या निवडणुका पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मागील तीन वर्षांपासून राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका कोरोनामुळे रखडल्या होत्या. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू केली असता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणुका रखडल्या होत्या. सरकार बदलल्यानंतर प्रभाग रचनेला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावर मागील दीड वर्ष सुनावणी सुरू आहे. राज्यातील २७ महापालिका आणि नगरपालिकांवर सध्या प्रशासक आहे.

आज सोमवारी सुप्रिम कोर्टात सुनावणी होती. मात्र सर्व वकिलांनी एकत्रित बसून निर्णय घ्यावा, असे आदेश न्यायालयाने दिल्याने पुढील तीन आठवडे सुनावणी होणार नाही. त्यानंतर न्यायालयाला उन्हाळी सुट्टी जाहीर होईल, म्हणजे पावसाळ्यात न्यायालयात सुनावणी झाली तरी पावसाळ्यात निवडणुका घेता येत नाही, त्यामुळेच पावसाळ्यानंतर दिवाळी दरम्यान या निवडणुकीचा धुरळा उडेल, असा राजकिय निरीक्षक यांचा अंदाज आहे.