मुंबई : विविध तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेच्या दिवा ते कल्याण दरम्यानच्या दोन्ही धीम्या मार्गावर येत्या रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आठ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रकावरही काहीसा परिणाम होईल.
ठाणे येथून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या आणि अर्ध जलद लोकल ब्लॉकच्या वेळी दिवा ते कल्याण दरम्यान जलद मार्गावर चालवण्यात येणार आहेत. तर कल्याणहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या आणि अर्ध जलद लोकल जलद मार्गावर कल्याण ते दिवा दरम्यान जलद मार्गावर धावतील. त्यामुळे लोकल १५ मिनिटे उशिराने धावतील. याबरोबरच सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे या हार्बरवरील दोन्ही मार्गावरही मेगाब्लॉक घेण्यात येईल. सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० पर्यंत असणाऱ्या ब्लॉकमुळे लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
रविवारी पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रलदरम्यान दोन्ही धीम्या मार्गावर मेगाब्लॉक होणार आहे. सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रल दरम्यान जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर धावतील.