रणनीती बूमरँग !

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर सक्रीय राजकारणात उतरणार अशा बातम्या गेल्या काही महिन्यांपासून प्रसिद्ध होत होत्या. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. परंतु ममता बॅनर्जी यांना श्री. किशोर यांना पक्षात स्थान द्यावेसे वाटले नाही. त्या निवडणुकीत भाजपासारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्याला धूळ चारुन प्रशांत किशोर यांनी खरे तर त्यांच्यासाठी कोणताही पक्ष अगदी लाल गालिचा अं थरेल असे वाटले होते. तृणूमूल जिंकली आणि काँग्रेसचा दारुण पराभव झाला. आता याच काँग्रेसमध्ये प्रशांत किशोर प्रवेश घेऊ इच्छित असताना त्यांची काही डाळ शिजली नाही. काँग्रेसला प्रशांत किशोर यांचे महत्व समजले नसावे किं वा निवडणुका जिंकण्यासाठी त्यांच्याकडे रणनीतीकारापेक्षा भक्कम उपाययोजना असली पाहिजे. असो. डोके बाज प्रशांत किशोर पक्षांना निवडणूक जिंकण्यासाठी भले लागत असले तरी पक्षाच्या धोरणात्मक आणि दैनंदिन कारभारात अशा ‘हुशार’ लोकांची लुडबुड त्यांना नको असते. काँग्रेसनेएकु णातच सर्व राजकीय पक्षांना समाजातील किशोर यांच्यासारख्या लोकांबद्दल ॲलर्जी असते हे सिद्ध के ले. निवडणुका जिंकण्याचे रहस्य उलगडणारी
एखादी हमखास पद्धत असते यावर मुळात राजकारण्यांचा विश्वास नाही. मतदारांची मने आणि मते जिंकणे हे रहस्य वगैरे असते असेही पुढाऱ्यांना वाटत नसते. पक्षाची आर्थिक धोरणे, बेरोजगारी, महागाई आदी समस्यांबाबतची त्यांची भूमिका, पाणी, रस्ते, वीज, घरे, सार्वजनिक वाहतूक आदी पायाभूत सुविधांबाबतचे नियोजन वगैरे
या बाबींपेक्षा जात वा धर्माचे हुकमी पान खेळणे अधिक खात्रीशीर ठरते. हे अनैतिक मार्ग प्रशांत किशोर यांच्या सारखे तज्ज्ञ सांगत नसतात. अर्थात राजकारणात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या प्रशांत किशोर यांना या अनैतिक बाबींचा आपल्या रणनीतीत समावेश करावा लागेल. ते त्यात किती यशस्वी होतात, हे सांगता येणार नाही. प्रशांत किशोर यांचे अं दाज प्रत्येक वेळा अचूक ठरतात असे नाही. त्याचा फटका काँग्रेसला बसला आहे. या कारणास्तवसुद्धा बहुदा पक्षाने त्यांची ‘ऑफर’ गांभीर्याने घेतली नसावी. किशोर यांच्यापेक्षा सरस आणि मुरब्बी नेते काँग्रेसकडे आहेत. त्यांचे चालत नाही तिथे किशोर यांचे कसे चालणार? त्यामागे पक्षनेतृत्व कारणीभूत असू शकते. प्रशांत किशोर यांना खरोखरीच काँग्रेसचे पुनरुज्जीवन करायचे असेल आणि म्हणून ते पक्षात प्रवेश घेण्यास इच्छुक असतील, तर ते सरळसरळ नेतृत्वालाच आव्हान देत होते असा अर्थ निघतो. हीच रणनीती त्यांच्या अं गाशी आलेली दिसते.