सरकारी कार्यालयांत एकाच भेटीत काम होण्याचा अनुभव सर्वसामान्यांना नाही. तसे कधी झालेच तर स्वत:लाच चिमटा काढून या सुखद धक्क्यावर विश्वास ठेवला जातो. अर्थात हा योग दरु्मिळ असल्याने सरकारी कामांसाठी चकरा मारणे हे सर्वसामान्यांच्या अं गवळणी पडले आहे. अं बरनाथ नगरपालिके त अनधिकृ त बांधकामांविरुध्द कारवाई करा या मागणीसाठी नागरिक वारंवार खेटे मारत असतात, परंतु प्रशासन त्यांना दाद लागू देत नाही, असे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना वाटले आणि त्यांनी प्रशासनाची ही उदासिनता चव्हाट्यांवर आणण्यासाठी एक नामी क्लृप्ती लढवली. पालिके त खेटे घालून चपला झिजत असल्याने त्यांनी चक्क लोखंडाच्या चपलांचा स्टॉलच पालिके बाहेर टाकला आहे! त्यामुळे प्रशासनात सुधारणा होईल ही त्यांची अपेक्षा आहे. बेकायदा बांधकामांवर कारवाई न होण्यामागची सर्वसामान्य कारणे आणि त्यामागचे अर्थकारण अं बरनाथमध्ये चालत नाही असे म्हणणे धाडसाचे होईल. सत्तेवर असलेला पक्ष त्याचा सर्वाधिक फायदा घेत असतो आणि सत्तेवर आल्यावर विपक्ष
काही वेगळे वागताना दिसत नाहीत. त्यामुळे खरे तर लोखंडी चपलांचा स्टॉल कायमस्वरुपी असला तरी तेथे मागणी होत राहील अशी परिस्थिती आहे. मुळात जे बेकायदा आहे त्यावर कारवाई का होऊ नये हा प्रश्न आहे. ती होत नाही यावरुन असे व्यवहार संशयास्पद असतात. त्यात अनेकांचे हितसंबंध गुंतलेले असतात. त्यात अनेकांचे हितसंबंध गुंतलेले असतात. कल्पकता म्हणून लोखंडी चपलांच्या प्रयोजनाचे कौतुक जरुर करावे लागेल, परंतु त्यामुळे प्रश्न सुटेलच असे नाही. बेकायदा बाधकामे रोखण्यासाठी हितसंबंधांची ‘लोखंडी’ साखळी तुटायला हवी, ती तोडण्यासाठी कोणी पुढाकार घेणार आहे काय? या समस्येबद्दल खरोखरीच तेवढी तळमळ
असते काय? बेकायदा बांधकामे पाडली जावीत हा शुध्द हेतू असतो काय? की आपल्यालाही या साखळीत सामावून घ्यावे ही सुप्त इच्छा असते? काँग्रेसच्या या अभिनव आं दोलनास ज्यांचा-ज्यांचा अनधिकृ त बांधकामाला विरोध आहे, त्यांनी पाठिं बा द्यायला हवा! तसे होणार नाही कारण त्यामागे राजकारण असते. भविष्यात काँग्रेसच्या लेटरहेडवर बेकायदा बांधकामाविरुध्द झालेल्या तक्रारींची दखल घेतलीही जाईल, परंतु सर्वसामान्य जनतेला चपला झिजवाव्याच लागणार. हा सार्वजनिक चिंतेचा विषय
सुटावा अशी प्रामाणिक इच्छा असेल तर पालिके तील अधिकारी आणि पदाधिकारी यांनी स्वार्थाच्या चिखलात बरबटलेली पादत्राणे बाहेर काढून कार्यालयात प्रवेश करावा. कर्तव्य बजावण्यासाठी नैतिकतेची गरज असते. लोखंडी चपलांची नाही. त्यामुळे प्रसिध्दीचा स्ट होईल, गरज आहे ती 24 टं कॅ रेट नैतिकतेची! त्यासाठी कोणी तयार आहे काय?