अवघ्या जगाला वेठीस धरुन झोप उडवणाऱ्या चीनने ज्या विषाणूचा प्रसार के ला तोच त्याच्या जीवावर उठला आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. चीनमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून सरकारने टाळेबंदी घोषित करुन जनतेच्या हालचालीवर निर्बंध आणले आहेत. त्याविरुध्द निदर्शने सुरु आहेत आणि अध्यक्ष जिनपिंग यांच्या
राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. बळाचा वापर करुन हा उद्रेक चिरडण्याचा प्रयत्न झाला आहे आणि अशा घटनांची सवय असलेल्या चीनबद्दल जगात आश्चर्य वगैरे व्यक्त व्हावे असे काही झालेले नाही. चीनच्या कम्युनिस्ट सरकारने दडपशाहीचा सर्रास वापर के ला आहे. जिनपिंग यांच्याविरुध्द खदखद होतीच. कोरोनास कारणीभूत असल्याचा आरोप जगाने के ल्यावर चीन एकाकी पडला होता. त्याबद्दल त्यांनी खंडणही के ले होते. परंतु जगाचा विश्वास बसला नव्हता. जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाला वुहान येथील प्रयोगशाळेत चौकशी करण्यापासून मज्जाव करणारे चीन सरकार अरेरावीमुळे बदनाम झाले होते. भारताच्या सीमेवर होणारी आगळिक असो की तैवानच्या स्वायत्ततेवरुन निर्माण झालेला पेच असो, जिनपिंग यांची मनमानी सर्वांनाच खटकत होती. चिनी जनताही कोरोनामुळे होरपळून निघाली
होती. त्यांची अर्थव्यवस्थाही कोलमडली होती. चीनमधील जनतेच्या कैफियती जगासमोर कधी आल्या नाहीत कारण तिथे आपल्यासारखे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. जनतेसमोर सरकारविरुध्द रस्त्यावर उतरण्याखेरीज पर्याय नव्हता आणि त्याचा अनुभव ताज्या घडामोडींमुळे येत आहे. लोकांचा असंतोष किती दिवस दाबून ठेवाल? 15 एप्रिल 1989 मध्ये चीनमधील तायनामेन चौकांत सरकारविरुध्द उठाव झाला होता. तो अत्यंत निर्दयपणे अक्षरश: ठेचण्यात आला होता. आं दोलकांच्या अं गावरुन रणगाडे नेण्यात आले होते. चीनचे सरकार कोणत्या थराला जाऊ शकते हे जगाने पाहिले होते. त्या आठवणी पुन्हा ताज्या होत आहेत. कोरोनाचा विषाणू हा शत्रू आहे की आपली जनताच शत्रू. अशा पेचात चिनी सरकार अडकलेले दिसते. या पार्श्वभूमीवर आपल्या सरकारची कामगिरी उठून दिसते. जनतेची मुस्कटदाबी आणि स्वातंत्र्यावर गदा आणण्याऐवजी व्यापक लसीकरण, लशींचे उत्पादन, अन्य देशांना मदत करण्याचे उदारमतवादी धोरण यांमुळे भारत हा अधिक सुसंस्कृत देश आहे हे सिध्द
झाले. ज्या देशातील जनतेला तेथील नेतृत्व अमान्य आहे तेथील अर्थव्यवस्था अत्युच्च शिखरावर पोहोचली तरी पोकळच ठरते. चीनचा पोकळपणा त्यांनी निर्माण
के लेल्या कोरोना नामक भूताने सिद्ध के ला. वाईट चिनी जनतेचे वाटते. त्यांना एकाच वेळी कोरोना आणि सरकार या दोघांचा मुकाबला करावा लागत आह