वंचितांचे प्रतिबिंब

श्रीमती द्रौपदी मुर्मूयांची गोष्ट स्वप्नवत आहे. ओडिशासारख्या तुलनेने मागास राज्यातील एका खेडेगावातील गरीब आणि वंचित वर्गातून आलेल्या श्रीमती मुर्मू थेट राष्ट्रपती भवनापर्यंत मजल गाठतात ही बाब भारतीय लोकशाही आणि समाजरचनेच्या सर्वसमावेशकतेमधील विश्वास दृढ करणारी आहे. पदग्रहण के ल्यावर त्यांनी व्यक्त के लेली प्रतिक्रिया म्हणूनच बोलकी आहे आणि समस्त उपेक्षित जनाला आश्वस्त करणारी आहे. ‘देशातील वंचित, गरीब, दलित आदिवासींना माझ्यात त्यांचे प्रतिबिंब दिसू शकेल,’ असे उद्गार नवीन राष्ट्रपतींनी काढले आहेत. देशातील लोकशाहीबद्दल सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना, श्रीमती मुर्मूयांचे म्हणणे दिलासादायक वाटते. मूठभर (आणि तेही श्रीमंत) लोकांच्या हातात लोकशाहीची सूत्रेगेली असून समाजातील गरीब माणूस राजकीय प्रक्रियेतून बाहेर फेकला गेला आहे असे जाणवते. केवळ आर्थिकदृष्ट्या गरीब असेही म्हणता येणार नाही. तर लोकशाही तत्व प्रणालीबद्दल आदर आणि संधी मिळाली तर अपेक्षापूर्ती करण्याची कुवत असणाऱ्या भावी लोकप्रतिनिधींना उमेदवारी देतानाही हात आखडता घेतला जातो. निवडून येण्याचे सर्वगुण त्याच्यात असतात पण तरीही ‘इलेक्टीव्ह-मेरिट’ नाही असे सांगून त्याला डावलले जात असते. पैसा, झुंडशाही आणि नैतिकतेशी फारकत घेतलेले असंख्य गरीब उमेदवार अक्षरशः बहिष्कृत झाले आहेत. भारतीय लोकशाहीतील हा दोष दर झू ाला तर श्रीमती मुर्मू म्हणतात तसे वंचित समाजाला संधी मिळू शकेल. भारतीय लोकशाही ही अध्यक्षीय पद्धतीची नाही. आपल्याकडे राष्ट्रपतींना मर्यादित अधिकार
आहेत. पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ देश चालवत असतात. त्यामुळे श्रीमती मुर्मूयांना मनोमन समाजातील उपेक्षित वर्गाबद्दल सहानुभूती असली आणि त्यांचा उद्धार व्हावा असे वाटले तरी निवडणूक यंत्रणा आणि मतदारांची मानसिकता या समांतर पद्धतीने बरोबर उलटच्या दिशेने प्रवास करीत आहे. निवडणूक नियमावलीत आणि भारतीय मतदारांच्या मानसिकतेत बदल झाला तरच गरिबातला गरीब आणि तळमळीचा कार्यकर्ता निर्णयप्रक्रियेत सहभागी होऊ लागेल. मतदारांनीच लोकशाहीत पैशांना आलेले फाजील महत्व कमी करायला हवे. निवडणुकीचे पावित्र्य जपण्याचे प्रयत्न निवडणूक आयोग करीत असते, पण अनेकदा मतदार कधी जातीच्या तर कधी
मोहाच्या सापळ्यात अडकतात. श्रीमती मुर्मूयांना राष्ट्रपती म्हणून त्यात सुधारणा घडवून आणण्याची मर्यादित संधी आहे, पण जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा त्यांनी उपेक्षितांचा क्षीण आवाज उठवायला हवा. तरच आणि तरच त्यांच्यात वंचितांचे प्रतिबिंब दिसेल.