शहापूरची तहान भागू शकत

ठाणे जिल्ह्यातील पाणीटंचाई दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. शहरी भागात या समस्येवरून ‘तहान-मोर्चे’, हांडे-मोर्चेवगैरे निघत असतात. ग्रामीण भागातील जनतेला
मात्र अशी आंदोलने करण्याचीही उसंत नसते. त्यांना पाणी जमा करून कसेबसे जिवंत रहाणे हेच ठाऊक असते. शहापूर तालुक्यातील पाणीटंचाईचा फे रा वर्षानुवर्षे सुरू असून अत्यंत हृदयद्रावक अशी तेथील गावांची परिस्थिती आहे. वास्तविक मुंबईला पाणीपुरवठा करणारा तालुका असा शहापूरचा लौकिक. भातसा, तानसा आणि
मोडकसागर धरणेयाच तालुक्यात आहेत. दरवर्षी पावसाळा संपत आला की ही धरणे ओसंडूनवाहू लागल्याच्या बातम्या आम्ही देत असतो. त्या वाचून जनतेला पाणीटंचाई टळणार असा दिलासाही वाटू लागतो. परंतु गेल्या काही वर्षात धरण भरून वाहण्याशी मुबलक पाणी मिळण्याचा संबंध राहिलेला नाही अशा खेदजनक निष्कर्षाला आपण पोहोचू लागलो आहोत. त्यामुळेच खर्डी परिसर, वाशाळा, तलवाडा-डोळखांब, कसारा- मोखावणे, आटगाव, कळमगाव, पेंढरघोळ, किन्हवली आदी परिसरात पाण्याचे दुर्भि क्ष्य झाल्याचे आश्चर्य वाटत नाही. याच भागातील धरणे भरतात परंतु जनता मात्र तहानलेली रहाते. ही विसंगती दूर करण्यात शासनाला इतके
सातत्यपूर्ण अपयश का येत आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. येथील जनतेच्या अं गात आंदोलन करण्याचेही त्राण राहिलेले नाहीत आणि शासकीय यंत्रणा टँकर पाठवून मलमपट्टी करीत आहे. हे चित्र कधी बदलणार हा प्रश्न आहे. या परिसरातील जलसंवर्धनाबाबत सामाजिक संस्था प्रयत्नशील आहेत. स्थानिक प्रशासन आणि या संस्था यांनी समन्वय साधून ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ क्षेत्रात काम करायला हवे. जलशिवार योजना असो की ‘चेक-डॅम’चेबांधकाम, तलावांतील गाळ उपसणे असो की गाव-पाड्यातील छपरांवरून पडणाऱ्या पावसाळी पाण्याचे ‘वॉटरहार्वेस्टिंग’ असो अशा योजना या संस्थांना सहभागी करून घेण्याच्या ठोस योजना आखल्या जायला हव्यात. लोकसहभागासाठी अनुकू ल असे वातावरण निर्माण करणे पाणीटंचाईकडे दरदृष् ू टीने पाहण्यासारखे ठरेल. तसेहोताना दिसत नाही. भारतात सीएसआर अर्थात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या नावाखाली असंख्य कं पन्या पाण्यासारख्या प्रश्नासाठी हात सैल ठेवतील. आम्ही ज्या रोटरी क्लबचे सदस्य आहोत त्याने गेल्या वर्षी टिटवाळ्याजवळ म्हस्कळ या गावी दोन चेक-डॅम बांधले. ते बांधण्यासाठी इंग्डमधील एका रोटरी लंक्लबने हातभार लावला होता. रोटरीतर्फे गेल्या आठ-
दहा वर्षात सुमारे पाचशे चेक-डॅम बांधले गेले आहेत. शासनाची इच्छा असेल तर पाण्यापासून वंचित जनता पुढे येईल. शहापूरमध्ये पाणी-फाउंडेशन सारखा पुढाकार तहसीलदार, गट विकास अधिकारी, सरपंच, आमदार उपविभागीय अधिकारी आदी मंडळी करतील ही अपेक्षा आहे. हा प्रश्न आंदोलनांनी सुटणार नाही. तिथे सकारात्मक कृतीशीलताच हवी.