समाज माध्यमे ही काळाची भले गरज बनली असली तरी ती प्रसंगी काळ होऊन मानवाला संपवूही शकते. अलिकडेच झालेल्या एका सर्वेक्षणात फे सबुक, इन्स्टाग्राम आदी माध्यमांचे ‘व्यसन’ जीवघेणे ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत बनले आहे. नैराश्य, आत्महत्येस प्रवृत्त होणे किं वा मानसिक संतुलन बिघडणे असे दष्पर ु िणाम या
माध्यमांच्या अति‘सेवना’मुळे होऊ लागल्याचे या सर्वेक्षणात नोंदवण्यात आले आहे. समाजाची आणि विशेषत: तरुणवर्गाची अधोगती फे सबुकच्या जन्मापासून म्हणजेच 2004-06 सालच्या दरम्यान सुरु झाली. आता ती भयावह पातळीपर्यंत पोहोचली आहे. ‘स्पायडरमन’ या चित्रपटात प्रमुख भूमिका असणाऱ्या टॉम हॉलंड या अभिनेत्याने समाज माध्यमापासून काही काळ विरक्ती घेण्याचे ठरवले आहे. हा निर्णय सोपा नव्हता कारण हॉलंडचे फे सबुकवर 68 दशलक्ष चाहते (फॉलोवर्स) आहेत. परंतु इन्स्टाग्राम आणि ट्विटरमुळे आपले मानसिक आरोग्य धोक्यात येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी या माध्यमांपासून दर र ू ाहण्याचा निर्णय घेतला. जे हॉलंडच्या बाबतीत झाले, ते तुमच्या -आमच्या बाबतीत घडत आहे. परंतु तरीही आपण त्याच्यासारखा कठोर निर्णय घेण्यास धजावलेलो नाही. फे ब्रुवारी 2004 ते सप्टेंबर 2006 या काळात अमेरिके तील महाविद्यालयांमध्ये फे सबुकचे आगमन झाले. हारवर्ड येथे त्याची सुरुवात झाली आणि विद्यार्थ्यांचा अभ्यासातील प्रतिसाद मंदावू लागला. या काळात अमेरिके त एक राष्ट्रीय सर्वेक्षण झाले आणि त्यात 4-3 दशलक्ष नागरिकांचे सर्वेक्षण झाले. फे सबुकमुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचा निष्कर्ष तेव्हा काढण्यात आला होता. या घटनेला आता 18 वर्षे लोटली आहेत आणि त्या निष्कर्षाचा विचार करता फे सबुक वापरावर प्रतिबंध घालून घेण्याऐवजी त्याच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा अर्थ भविष्यात फार वाईट घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. फे सबुकचा अतिवापर के ल्यामुळे नैराश्य आणि त्याच्याशी संबंधित त्रास यांचे प्रमाण 20 टक्क्यांवर पोहोचले आहे. त्याचा एक परिणाम म्हणजे नोकऱ्या गमावण्याचे प्रमाण वाढले आहे. फे सबुकवरील ‘लाईक’ (Like) या बटणाचा अं तर्भाव झाल्यापासून ही गडबड सुरु झाल्याचे मानसोपचारतज्ज्ञांच्या पाहणीत आढळले. तरुणांमध्ये खास करुन दहा ते 24 वयोगटात आत्महत्येचे प्रमाण वाढत जाणार आहे. 2000 ते 2007 या सात वर्षात हे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी झालेल्या प्रयत्नांना यश मिळाले होते. परंतु 2007 ते 2017 या दशकात या वयोगटातील आत्महत्येच्या प्रकारांत 57 टक्के वाढ झाल्याची नोंद आढळते. फे सबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आदींचा या चिंता वाटावी अशा घटनेशी संबंध आहे. समाज-माध्यमे काळाची गरज आहे यात वाद नाही. त्यामुळे उद्योग-व्यवसायात बढती झाली, जुने मित्र एकमेकांशी जोडले गेले, चर्चा आणि संवाद यांची दालने खुली झाली, परंतु त्याचबरोबर
त्यांचे काही दष्पर ु िणाम समाजाचे स्वास्थ्य कु रतडू लागले. फे सबुकवाले आपल्या खऱ्या प्रतिमेची आभासी प्रतिमेशी तुलना करु लागले. ज्यांना आदर्श मानले त्यांच्या निर्माण करण्यात आलेल्या प्रतिमांची खातरजमा न करता अनुकरणाची सवय लागली, त्यातून पदरी दिशाभूल पडली. 2017 मध्ये लंडनमधील एका 14 वर्षीय मुलीने के लेल्या आत्महत्येचा संबंध समाज माध्यमांवर तिच्या सक्रीयतेशी असल्याचे समोर आले. माणूस स्वत्व विसरु लागला. आभासी दनिु येत वावरु लागला आणि वास्तवाच्या वाटेवर भरकटत मृत्यूच्या दाढेत जाऊ लागला. वाढत्या नैराश्याने आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आत्महत्येच्या विचाराने ही बाब अधोरेखित के ली. पण टॉम हॉलंडला जे शहाणपण सुचले ते आपल्यापैकी अनेकांना शिवलेलेही नाही. ही खरी शोकांतिका!