राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद पाहता उद्धव ठाकरे गोटात अधिक अस्वस्थता पसरेल की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असा प्रश्न उपस्थित होत आहे. दोन्ही सेना एकमेकांविरुद्ध कु रघोडी करीत राहिल्या तर भाजपाचाच फायदा होईल असा निष्कर्ष राजकीय निरीक्षक काढत असतील तर तो चुकीचा नाही. माहिमच्या समुद्रात दर्गा उभारण्याचे काम सुरू असलेला गौप्यस्फोट राज ठाकरे करतात काय आणि अवघ्या काही तासांत त्याविरुद्ध कारवाई होत असेल तर मनसेला आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात महत्व येणार असे दिसते. राज मोठे होणे म्हणजे उद्धव छोटे होणे हा साधा हिशोब मांडला जाऊ लागला आहे आणि त्यास उद्धव गटाने एक प्रकारे दजोरा ु दिला आहे. राज यांचा दर्ग्याबाबतचा आरोप हा भाजपाने लिहिलेल्या ‘स्क्रिप्ट’चा भाग होता असा थेट आरोप खा. संजय राऊत यांनी के ला आहे. जे राजकारणातील प्रमुख नेत्यांची भाषणे बारकाईने ऐकतात त्यांना राज यांनी मशिदीवरील के लेली टीका याच स्क्रिप्टचा भाग होता असे म्हणता येऊ शके ल. आगामी विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा मनसेला सोबत घेण्याची योजना तर आखत नाही अशी चर्चा सुरू झाली आहे. निवडणुकांबाबत कोणी अंदाज बांधत नसताना राज यांनी मात्र निवडणुकांबाबत सुतोवाच के ल्यामुळे भाजपा नेतृत्वाच्या मनातही मतदारांचा कौल मागून महाराष्ट्राच्या राजकारणातील अनिश्चिततेला पूर्णविराम देण्याचे वाटत आहे काय, अशी शंका येते. राज यांची विधाने आणि सर्वोच्च न्यायालयात दोन्ही सेनांमध्ये सुरू असलेला कायदेशीर लढा एका निर्णायक टप्प्यावर येणे हा निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची कुणकुण लागल्यामुळे भाजपातर्फे आगामी राजकारणाची पावले उचलली जाऊ लागली असतील तर नवल नाही. राज ठाकरे यांच्या सभेला झालेली गर्दी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला तोडीस तोड होती असेमानायला हरकत नाही. या गर्दीचे रूपांतर मतांमध्ये कसे करायचे हा सवाल पुन्हा पक्षपातळीवर आणि राजकीय वर्तुळात सुरू होईल. इतकी गर्दी जमा करणारे नेते खरोखरीच राहिलेले नाही. त्यामुळे जनतेचे प्रत्यक्ष राजकीय समर्थन आणि व्यक्तिगत करिष्मा यापैकी महत्त्वाचे काय याभोवती चर्चा होईल. त्यादृष्टीने मनसेला गांभीर्याने व्यूहरचना आखावी लागेल. त्यातही भाजपाचा ‘अँगल’ महत्त्वाचा ठरतो. नव्हे निर्णायक ठरू शकतो.