मुर्मू निवडीचे मर्म !

राष्ट्रपती निवडणुकीतही राजकीय विचार होत असतो, हे अमान्य करता येणार नाही. त्यामुळे द्रोपदी मुर्मू यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे जाहीर झालेल्या उमेदवारीमागे काही हेतू असण्याची शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करीत आहेत. ओडिशा राज्यातून येणाऱ्या श्रीमती मुर्मू या अनुसूचित जमातीत जन्माला  लेल्या
आहेत. त्यांना उमेदवारी देऊन भाजपा अनुसूचित जमातीमधील नागरिकांची मने आणि मते जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे काय, असा सवाल राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ या त्यांच्या भूमिके ला साजेशी ही उमेदवारी आहे, असेही बोलले जात आहे. परंतु असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरते.
कारण लोकसभेच्या 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाला 44 टक्के आदिवासी मतांची प्राप्ती झाली होती. काँग्रेसच्या वाट्याला 31 टक्के होती. एकू ण मतदानात 72 टक्के आदिवासींनी मतदानाचा हक्कबजावला होता, असेही आकडेवारी दर्शविते. अशावेळी तरीही मुर्मू यांची निवड झाली आहे. गेल्या काही वर्षात आदिवासी बांधवांचा सक्रीय राजकारणातील सहभागही वाढला आहे. यामागे असे कारण असू शकते की भाजपाला आपण के वळ मध्य आणि उच्चवर्गीयांवरच भिस्त आहे, ही प्रतिमा बदलायची असेल. गेल्या काही वर्षांपासून भाजपाने नियोजनबद्ध पद्धतीने ‘सोशल इंजिनिअरिंग’चा (सामाजिक अभियांत्रिकी) प्रयोग के ला आहे. सर्व जाती -धर्मांना एकत्र आणून हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे त्यांचे धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी राजकारणाला साच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न के ला. त्यात ते यशस्वीही झाले. अनेक राज्यांच्या मुख्यमंत्रीपदी असणाऱ्या व्यक्ती पाहिल्या तर भाजपाने जातीनिहाय बेतलेल्या समाजातील मक्तेदारी संपविण्याचा प्रयत्न के ला आहे. या विचारधारेला बळकटी देण्यासाठी श्रीमती मुर्मू यांची निवड झाली असावी.
सत्तेचे सुकाणू सर्वसामान्यांच्या हाती देण्याचे धोरण अं मलात आणताना चहावाला आणि चौकीदार (नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात वापरण्यात येणारे शब्द) विरुद्ध शहजादे (राहूल गांधी) असा विचार समाजात दृढ करण्यात यायचे हेच कारण असावे. श्रीमती मुर्मू यांचा विजय ही के वळ एक औपचारिकता बनून राहिली आहे. महिलांना आणि खास करून उपेक्षित वर्गातील महिलेला संधी देऊन भाजपा आगामी निवडणुकीसाठी लागणारी पोषक प्रतिमा तयार करीत आहे असे म्हटले तरी वावगे ठरु नये. विशेष म्हणजे श्रीमती मुर्मू या झारखंडच्या राज्यपाल म्हणून कार्यरत होत्या. त्यामुळे राष्ट्रपती म्हणजे सरकारचा रबर-स्टॅम्प ही प्रतिमा त्या उमटू देणार नाहीत. देशातील महिलांचे प्रश्न पूर्णपणे सुटलेले नसताना श्रीमती मुर्मू यांना मिळालेली संधी या कार्यासाठी त्या वापरतील ही अपेक्षा आहे.