बदल्या, बढत्या आणि अस्मिता !

सरकारी कर्मचाऱ्यांच्या आणि विशेषत: अधिकाऱ्यांच्या बदल्या-बढत्या ही बाब तसे पाहायला गेले तर पूर्णत: प्रशासकीय. एखाद्या खात्यात तीन वर्षांपेक्षा अधिक काळ कोणा अधिकाऱ्यांस ठेवता कामा नये हा अलिखित नियम वर्षानुवर्षे चालत आलेला. त्यामागची कारणे अनेक आहेत. कोणताही माणूस एकाच ठिकाणी राहिला तर तो त्याची मक्तेदारी गाजवू लागतो आणि त्यातून अनैतिक व्यवहारांना सुरुवात होते. त्याच्या कार्यक्षमतेवर त्याचा विपरीत परिणाम तर होतोच पण त्याचबरोबर त्यावर कारवाई न झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षित सेवेपासून वंचितही रहावे लागते. जनतेवरील हा अन्याय दूर करण्यासाठी तीन वर्षाची कमाल मर्यादा आखून घेण्यात आली. तिचे बऱ्यापैकी पालन होत असते, परंतु त्याचा कार्यक्षमता आणि जनतेला मिळणाऱ्या सेवेशी संबंध असतोच असे नाही. जी गत बदल्यांची तीच बढत्यांची. इथे तर ज्ष्ठतेबरोबर ये आता आरक्षणाचा मुद्दाही पुढे आला आहे. त्याचबरोबर कोणता अधिकारी वरिष्ठांची मर्जी साभाळं ू शकतो यावरही त्याची बढती अवलंबून असते. एखाद्या विशेष हुद्यावर बढती किं वा बदली व्हावी यासाठी आर्थिक व्यवहार होत असतात आणि मग सरकारी अधिकाऱ्यांत भ्रष्टाचार का थांबत नाही असा वांझोटी प्रश्न विचारला जात असतो! भ्रष्टाचाराचे, अनैतिकतेचे, अकार्यक्षमतेचे मूळ बदली आणि बढती यांत असते आणि हा विषय प्रशासकीय न राहता राजकीय कधी झाला हेही कोणाला कळले नाही. या पार्भू श्व मीवर महाराष्ट्रातील 39 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि त्यापैकी पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्या थांबवण्यात आल्या आहेत. गृहमंत्र्यांच्या कार्यक्षेत्रातील या प्रकरणात शिवसेनेने हस्तक्षेप के ला आणि निर्णय रद्द झाला. यावरून येत्या काही दिवसांत चर्चेचा धुरळा उडत राहील. परतु प्रशासकीय ‘स् ं स’ म्ह पे णून अशी काही राहिलेली नाही आणि ती पुसून टाकण्याचे काम राज्यकर्ते वारंवार करीत असतात. जणू काही तो त्यांचा अधिकार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे आणि गृह खाते राष्ट्रवादीकडे. असे असले तरी शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना आणि ज्येष्ठ मंत्र्यांना विश्वासात घेऊनच इतके
महत्वाचे निर्णय घेण्याचे सके त ं पायदळी तुडवले गेले. त्यातून हा घोळ झाला. हा निर्णय महत्वाचा एवढ्यासाठीच कारण प्रत्क बदली-बढतीचे ये दरगा ू मी परिणाम होत असतात. नेत्यांचे राजकारण त्यावर अवलंबून असते. ‘आपला’ अधिकारी अमक्या पदावर असावा यामागे त्या अधिकाऱ्याची गुणवत्ता कारणीभूत नसते तर त्याच्या अंगी असलेले अन्य ‘गुण’ ! हे गुण नेत्यांना आपले राजकारण पुढे नेण्यासाठी उपयोगी पडत असतात. जनतेचे हीत वगैरे या बाबी प्राधान्यक्रमात शेवटी येतात. या घटनेकडे शुद्ध राजकीय नजरेतून पाहिले तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसते ती अशी की शिवसेनेला सर्व बाजुंनी घेरण्याचा प्रयत्न होत असला तरी ती वेळप्रसगी डरकाळी ं
फोडू शकते आणि आपल्याला गृहीत धरु नका असा सदेशही देत असते. सध् ं या सर्व वादापासून द ं र अस ू णाऱ्या ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यानी डरकाळी फोड ं ून शिवसेना जागी आहे आणि अशी आगळिक सहन करणार नाही असा इशारा दिला आहे. मराठी माणसाच्या अस्मितेची काळजी वाहणारी शिवसेना आपल्या राजकीय अस्मितेची मोडतोड झालेली कशी सहन करील हेच ना.शिंदे यांनी दाखवून दिले आहे. ते चूक की बरोबर हा भाग अलाहिदा. पण राजकीय अटीतटीत सर्वमान्य !