फसलेली गांधीगिरी !

सजय दत्त यांची प्रमुख भूमिका असलेला ‘लगे रहो मुन्नाभाई’ हा चित्रपट 2006 साली प्रदर्शित झाला आणि आजही तो रसिक प्रेक्षकांच्या चांगला लक्षात आहे. त्याचे कारण या चित्रपटात असलेली ‘गांधीगिरी’ ही सकल्पं ना. एखाद्या नियमितपणे शिस्त मोडणाऱ्या वा अवैध काम करणाऱ्याला कारवाईचा दट्टा दाखवण्याऐवजी त्यास गुलाबपुष्प देऊन ‘सत्कार’ करुन लज्जित करणे हा या गांधीगिरीचा मुख्य उद्देश असे. त्यामुळे निर्ढावलेले सरकारी कर्मचारी लाजेकाजे का होईना सुधारतील आणि कर्तव्य चोख बजावतील ही वेडी आशा. या अभिनव प्रयोगाचा इतका बोलबाला झाला की आंदोलक मडळी त्याच ं ा वारवं ार उपयोग करु लागले. अर्थात या शस्त्राची धार बोथट झाली आणि आता तर माध्यमांत प्रसिध्दी मिळवण्यापलिकडे त्याचा फार उपयोग राहिला नाही. उल्हासनगर महापालिकेने कामावर उशिरा येणाऱ्या (लेट-लतिफ) कर्मचाऱ्यांचे स्वागत झेंडूची फु ले देऊन के ले. जे प्रामाणिकपणे दररोज येतात त्यना ां बरे वाटले असेल. म्हणजे आपल्या सहकाऱ्यांची नाचक्की झाली यासाठी नाही तर किमान वेळेत येऊन शाबासकी न देणाऱ्या हातांनी कारवाईचा गांधीगिरी बडगा तरी उचलला होता. अर्थात उल्हासनगर महापालिके त पुढील दोन-चार दिवस (हेही जरा जास्तच झाले!) कर्मचारी वेळेत आलेले दिसू शकतील. परतु ग ं ांधीगिरीच्या मात्रेचा उपयोग हा होमिओपॅथीसारखा असतो. हळूहळू त्याचा गुण येत असतो. अॅलोपॅथीसारखे नाही. कधी-कधी तर उशिरा येण्याचा विषाणू या कर्मचाऱ्यांत इतका खोल भिनला असतो की त्यांच्यावर अशा गांधीगिरीचा अनुकू ल परिणाम होणेही थांबलेले असते. या प्रतिकारशक्तीला वास्तविक खाजगी ससं ्थांत उत्तरदायित्वाचे जे इंजेक्शन टोचले जाते तेच देण्याची गरज असते. परतु हे इ ं ंजेक्शन अनेकदा पुढाऱ्यांच्या हातात असते. ते कोणाला द्यायचे, द्यायचे नाही किं वा रिअॅक्शन आली तर त्यावर कसा इलाज करायचा ते हे ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ ठरवत असतात. त्यामुळे उल्हासनगर प्रशासनाने कारवाई के ली तरी लेटलतिफमडळी क ं ाही दिवसांतच उजळ माथ्याने शर्टाच्या खिशावर किं वा महिला असतील तर के सांत माळून फिरताना दिसतील. अशा लेट कर्मचाऱ्यना ां मिळणाऱ्या पगाराशी ते इमान राखतात का, असा थेट सवाल विचारण्याची वेळ आली आहे. कें द्रीय मंत्री अनुराग ठाकू र यांनी काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये हा सवाल उपस्थित के ला होता. महापालिका कोणतीही असो ठाणे की कल्याणडोंबिवली सर्वत्र अकारक्षमत ्य ा बोकाळलेली दिसते. नागरिकांना हेलपाटे मारायला लागत नाहीत असा दावा एकही महापालिका करु शकणार नाही. गांधीगिरी शब्द प्रचलित होण्यापूर्वी अनेक वर्षांपूर्वी जनाची नाही
तरी मनाची लाज वाटावी अशा उक्तीचा जन्म झाला होता. हा सुविचार बहुसख्य सरक ं ारी कर्मचाऱ्यांच्या गावी नसतो ही बाब अलाहिदा. लेट आएगा लतिफ तो क्या करेंगे गांधी? असो. यानिमित्ताने अत्रेंच्या गुलाबाच्या फु लांची आठवण झाली.