कोरोना: चुकांची पुनर्रावृत्ती नको !

चीनमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्याचे पडसाद जगभर उमटले नाहीत तरच नवल. आता-आता कु ठेजगभरातील व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले असताना महासाथीच्या नव्या विषाणूने थैमान घालायला सुरुवात केल्यामुळे आर्थिक घडी पुन्हा विस्कटते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसात शेअर मार्केटमध्ये झालेली पडझड हा त्याचाच पुरावा आहे. ज्या चीनची भूमिका संशयास्पद होती आणि संशय बळावा असे अत्यंत हेकट वर्तन या देशाने करुन जगाला आणि खास करुन भारताला वेठीला आणण्यासाठी या महासाथीचे नियोजन केले होते काय या प्रश्नानाचे उत्तर अद्याप मिळाले नसताना चीनने पुन्हा त्यांच्या देशांतर्गत समस्यांतून मार्ग काढण्यासाठी जगात घबराट निर्माण करण्याचा मार्ग तर चोखळला नसावा, अशी चर्चा होत राहील. जगावर अधिसत्ता गाजवण्याची चीनची मनिषा लपलेली नाही. परंतु त्यांचा पहिला प्रयत्न फसला. त्यात भारताची कामगिरी वाखणण्याजोगी होती आणि त्यामुळे साहजिकच असूयेची भावना चीनच्या सत्ताधिशांच्या मनात होती. सीमेवर कु रापती काढणे, भारताची भूमी बळकावणे वगैरे प्रयत्नांना यश मिळत नाही म्हणून पुन्हा कोरोनाचे अस्त्र काढले गेले काय असा सवालही विचारला जात आहे. एकीकडे आं तरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचे हे सूर निघत असताना त्याचे परराष्ट्रीय व्यवहारांबाबतचे अन्वयार्थ काढलेजाऊ शकतात. ते कसे काढायचे, त्यावर उपाय काय करायचा, देशाचे सार्वभौमत्व कसे अबाधित राखायचे आदी विषय राजकीय पातळीवर हाताळलेजातील. परंतु कोरोनाची साथ भारतात आली तर त्याचा कसा सामना करायचा, उपचार पध्दती, प्रतिकारशक्ती, आरोग्य यंत्रणा, त्यावर होणारा खर्च, लसीकरणाबाबतचेधोरण, मनुष्यबळ आदी तांत्रिक बाबी सरकारला हाताळाव्या लागणार. या सर्व संभाव्य आणीबाणीजन्य स्थितीचा अं दाज घेऊन समाजाची मानसिकता कशी असावी याचाही समांतरपणे विचार व्हायला हवा. भीतीपोटी माणसे मानसिकदृष्ट्या खचली आणि प्रतिकार करण्याच्या त्यांच्या मनोबलावर परिणाम झाला. माणसे दगावली ती खचलेल्या मनोधैर्यामुळे असा अनुमान आता सरसकट काढला जातो. विशेष म्हणजे त्याला वैद्यकीय क्षेत्रातील काही मान्यवर पुष्टी देत आहेत. जसजसे हे मनोबल वाढले तसे रोगावर मात करण्याचे प्रमाण वाढले. भारताने लसीकरणाची व्यापक मोहीम घेतली. लसनिर्मितीत विलक्षण कामगिरी बजावली वगैरे बाबींचा विचार केला तर आपण चिनी आणि अन्य पाश्चात्त्य देशांपेक्षा
सकारात्मक असल्यामुळेच आपले व्यवहार पूर्वपदावर आले. यामागे वैद्यकीय क्षेत्राचा, विशेषत: संशोधकांचा सिंहाचा वाटा असला तरी भारताचा हेतू शुद्ध होता हे नाकारुन चालणार नाही. अर्थात इतके भाबडे राहूनही चालणार नाही. पण म्हणून कोरोनाच्या आहारी जाता कामा नये, हेही तितकेच खरे!