तापमान वाढण्याचे दिवस. देशात काही ठिकाणी उष्माघाताचे बळी जाऊ लागले आहेत. उन्हाळा म्हटलं की पाणीटंचाई ओघानेआलीच. आणि त्यावरून विरोधी पक्षांची आंदोलने. हे इतके नित्याचे झाले आहे की नागरिकांना पाणी भरण्यासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा आणि टँकर येताच उडणारी झुंबड ही छायाचित्रे वर्तमानपत्रात दिसली नाही तर चुकल्यासारखे वाटू लागते. परंतु वर्षानुवर्षे सुरू असलेला हा प्रकार कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारे शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था थांबवू शकत नाही याचे आश्चर्य वाटते. ठाण्यात, कल्याण-डोंबिवलीत आणि जिल्ह्यातील अन्य भागांत पाणीटंचाईची समस्या भीषण बनत चालली असून त्याकडे लक्ष वेधण्यासाठी ‘तहान मोर्चे’ काढले जात आहेत. त्यामुळे प्रश्न सुटेल की नाही हे सांगता येणार नाही. परंतु विरोधी पक्षांना सत्तारुढ पक्षाला उघडे पाडण्याची संधी जरूर मिळते. ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा येथे असाच एक मोर्चा निघाला. महापालिका अधिकाऱ्यांनी त्यांची छापील उत्तरे दिली आणि नेत्यांनीही ठराविक ‘बाईट’ देऊन आपणच कसे कै वारी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न के ला. प्रत्यक्षात हे दोन्ही घटक गेल्या वर्षीचा पावसाळा संपल्यापासून पाणीटंचाई होईपर्यंत काय करीत होते हा कळीचा मुद्दा आहे. सत्ताधीशांनी काही के ले नाही असा आरोप ते करीत आहेत आणि त्यात तथ्यही आहे. परंतु पाण्याच्या बाबतीत सर्वांचेच चुकत असते हे आपण कधी मान्य करणार आहोत? नेमेचि येतो उन्हाळा या उक्तीनुसार पाणीटंचाई होणार नाही याकरिता कोणती खबरदारी घेतली जाते? भूगर्भ पातळी खालावत चालली असताना आणि दिव्यासारख्या भागात कू पनलिकांचे पाणी पिण्याजोगे असण्यााबाबत शंका असताना महापालिके ने कोणते नियोजन के ले होते? टँकरने पाणीपुरवठा करणे हा खरे तर अंतिम उपाय असायला हवा. परंतु खड्डे बुजवायला पेव्हर-ब्लॉकचा झटपट मार्ग शोधणाऱ्या प्रशासनाला टँकरची मदत हा हमखास तोडगा वाटतो हे दर्ुदैव आहे. जलवाहिन्या टाकण्याची कामे अर्धवट अवस्त आहेत. थे नवीन जोडण्या आणि बेकायदा जोडण्या याबाबत सावळा गोंधळ आहे, कुठे जलकुं भच नाही तर कुठे
जलवाहिन्या फु टल्या आहेत. ही सर्व देखभालीची कामे करण्यापासून पाणी विभागाला कोणी थांबवले होते? स्थानिक पुढारी आंदोलने जितक्या उत्साहाने पुकारतात
तितक्या तत्परतेने याच अधिकाऱ्यांच्या मागे लागून कामे का करून घेत नाहीत? पाण्याची चोरी करणारे नागरिकही या समस्येत तितके च जबाबदार आहेत. पाणी काटकसरीने कसे वापरावे याची जनजागृती करावी असे पुढाऱ्यांना का वाटत नाही? एकू णातच पाणीसाक्षरतेचा अभाव हा पाणीटंचाईस कारणीभूत ठरत असतो. यावर्षीही ९९ टक्के पाऊस पडण्याचे शुभवर्तमान आहे. पण असे अधिकारी आणि पुढारी त्यावर पाणीच पाडतील. सर्वांनाच बदलायला हवे.