काँग्रेसमध्ये थरूर थरार

काँग्रेस गोटातून अनेक दिवसांनी आश्वस्थ करणारी बातमी आली आहे. खा. शशी थरूर हे अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभे राहणार असल्याचे जवळजवळ निश्चित
झाले आहे. इंग्रजी आणिहिंदी भाषांवरील त्यांचे प्रभुत्व, तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रखर आणि अभ्यासपूर्ण वक्तृत्व असे देशातील मध्यमवर्गीयांना भावणारे सर्व गुण खा. थरूर यांच्या ठायी असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला अच्छे दिन येऊ शकतील. वास्तविक ज्या 23 जणांनी काँग्रेसच्या नेतृत्वाविरुद्ध आणि कार्यपद्धतीबद्दल आक्षेप नोंदवण्यासाठी रणशिंग फुं कले होते, त्यापैकी थरूर एक होते. या 23 जणांपैकी गुलाम नबी आझाद यांनी पक्ष सोडला तर कपिल सिब्बल, चिदंबरम, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी शांत असले तरी त्यांची नाराजी लपलेली नाही. थरुर रिंगणात उतरले तर हे ज्ष्ठ नेते प ये क्षात राहून त्यांना अपेक्षित सर्व चुका सुधारुन पक्षास योग्य मार्गावर आणू शकतील, हा आशावाद आहे. भाषांवरील प्रभुत्वाव्यतिरिक्त खा.थरूर यांच्या प्रतिमेबद्दल तरुणवर्गाला विशेष आकर्षण आहे. सोशल मीडियावर सक्रीय असल्यामुळे त्यांचा पक्षातील कार्यकर्त्यांशी तसेच नेत्यांशी उत्तम संपर्क आहे. तीन वेळा लोकसभेत निवडून आल्यामुळे जनसमर्थन निर्विवाद आहे. तुलनेने अन्य काँग्स नेते, अगदी रे डॉ. मनमोहन सिंग, हेही मागच्या दाराने अर्थात राज्यसभेतून संसदेत गेले होते. संयुक्त राष्ट्र संघटनेत काम के लेले खा. थरूर यांचे आं तरराष्ट्रीय नेत्यांशी ॠणानुबंध आहेत. त्यामुळे पक्षाला देशात तसेच परदेशात नवचैतन्य देणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाईल. राहुल गांधी यांनी भारत-जोडा यात्रा
सुरु के ली असली तरी एका मर्यादेपलिकडे त्यांना सहानुभूती व्यतिरिक्त काही मिळत नाही. जनतेची त्यांच्याकडून फार अपेक्षा आहे. त्यांची वैचारिक बैठक, विषयाची मांडणी, आदी बाबी देशातील विचार करणाऱ्या नागरिकांना अनेकदा पोरकट वाटतात. भाजपाचे समाज माध्यमवीर त्यांची जी खिल्ली उडवतात तशी खा.थरूर यांची उडवताना दहा वेळा विचार करावा लागेल. तोडीस तोड उत्तर देऊन भाजपाला विरोध करणाऱ्या नागरिकांवर थरूर जी छाप पाडू शकतील ती राहुल गांधी यांना जमणे कठीण दिसते. या पार्श्वभूमीवर खा.थरूर यांना संधी देणे पक्षाला उपकारक ठरू शकते. मतदारांच्या मानसिकतेत गेल्या काही वर्षात अमुलाग्र बदल झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या मानसिकतेत बसले आहेत. त्यांना दर के ल्याश ू िवाय काँग्रेसला सत्तेवर येता येणार नाही. किं बहुना नियोजित अध्यक्षाकडून काँग्स करे ार्यकर्त्यांची आणि समर्थकांची हीच अपेक्षा असणार. त्यास थरूर पूर्णपणे उतरतील कारण ते चमचेगिरीचे जोखड भिरकावून रिंगणात उतरणारे एकमेव उमेदवार आहेत.