राजकारण्यांपासून माध्यमातील प्रभावी व्यक्तींपर्यंत आणि उद्योजकांपासून प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकार्यापर्यंत मोठ्या पदांवर कार्यरत आसामींचे फोन हॅक होत असल्याची खळबळजनक माहिती उजेडात आली आहे. ही एक प्रकारची हेरगिरी असून त्यास केंद्र सरकार जबाबदार आहे, असा आरोप विरोधी पक्ष म्हणुन काँग्रेसने केला आहे. त्याचा सराकरने इन्कार केला आहे. परंतु हे प्रकरण नेहमीच्या उथळ अशा राजकीय आरोप-प्रत्यारोपांपलिकडे जाऊन पाहिला हवे कारण त्यातून राष्ट्रीय सुरक्षिततेचा गंभीर विषयही गुंतलेला असून शकतो.
इस्त्राईल येथील पेगासस या संगणकप्रणाली उत्पादक कंपनीे हे कारस्थान असल्याचे बोलले जात असून, या कंपनीस हे उपद्व्याप करण्याची अनुमती कशी वा कोणी मिळवून दिली हा खरा प्रश्न आहे.काँग्रेसचे खासदार राहुल गांधी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर, अश्विनी वैष्णव आणि प्रल्हाद पटेल हे केंद्रीय मंत्री, माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा, आरोग्य तज्ज्ञ डॉ. गगनदीप कांग यांच्यासह जगभरातील 180 पत्रकार पेगाससच्या रडारवर होते,अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे. चिंतेची बाब म्हणजे यापैकी 38 पत्रकार भारतीय आहेत.
केंद्र सरकारने आणि खास करून ज्येष्ठ केंद्रीय मंत्री वैष्णव यांचा फोन ‘हॅक’ होत असल्याचा शंका व्यक्त होत आहे, त्यांनीच विरोधी पक्ष आणि काही माध्यमे भारतीय लोकशाहीला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे म्हणाले. काँग्रेस मात्र भारतीय जनता पक्षाचे नामकरण भारतीय जासूस पार्टी असे केले आहे आणि याप्रकरणी चौकशीची मागणीही केली आहे.
कोरोना विषाणूचा उगम आणि संसर्ग हे आंतरराष्ट्रीय वर्चस्वासाठी चिनने रचलेले कुभांड असल्याचे बोलले जात असताना भविष्यातील युद्धे ही कशा प्रकारे लढली जाणार याचा अंदाज यावा. न दिसणारा विषणू आणि संगणक प्रणाली ही या नव-युद्धांची शस्त्रे असणार आहेत. आपण त्याकडे गांभीर्याने पाहिला हवे. जर काँग्रेसच्या आरोपांत तथ्य असेल तर भाजपाने त्याची सखोल चौकशी करायला हवी. आपली भूमिका ही पालकाची आहे आणि त्यामुळे बेगडी भांडणे आणि सवंग लोकप्रियता यात भाजपाने अडकता कामा नये. जनतेच्या मनात निर्माण होणारे संशय तातडीने दूर करण्याचे प्रयत्न व्हायला हवे. जर भाजपाला अशा आरोपांना देशात अस्थिरता पसरवण्याचा प्रयत्न दिसत असेल तर त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर हे प्रकरण चव्हाट्यावर आणून देशाच्या सुरक्षिततेला बाधा आणण्याचे कथित प्रयत्न हाणून पाडायला हवेत.