लघुउद्योजक संघटनेचे अध्वर्यू मधुसुदन उर्फ अप्पा खांबेटे यांचे निधन छोट्या आणि मोठ्या उद्योजकांसाठी मोठी पोकळी निर्माण करणारे आहे. श्री. खांबेटे यांनी जवळजवळ पूर्ण जीवन लघुउद्योजकांच्या उत्कर्षासाठी व्यतीत के ले असे म्हटले तर वावगे ठरेल. स्वतः लघुउद्योजक असल्यामुळे आपल्या व्यवसायबांधवांच्या अडचणी आणि व्यथा ते उत्तम प्रकारे जाणून होते आणि त्यामुळेच त्यांचे नेतृत्व एकमुखाने स्वीकारण्यात आले होते. अतिशय अभ्यासू आणि शिस्तबद्ध असलेल्या श्री. खांबेटे यांचा बाणेदारपणा सरकारदरबारी आदरयुक्त जरब निर्माण करणारा होता, हे मान्य करावे लागेल. आरोग्य साथ देत नसतानाही शेवटच्या श्वासापर्यंत श्री. खांबेटे यांनी लघुउद्योजकांच्या कल्याणासाठी काम के ले. सरकारशी भांडून के वळ आपल्या पदरात फायदा पाडून घेण्याची संकु चित वृत्ती त्यांनी कधी दाखवली नाही. एका उदात्त हेतूने ते कार्यरत राहिले आणि संघटना वाढवली. श्री. खांबेटे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची फौज तयार झाली असून ‘टिसा’ असो की ‘कोसिआ’ यांचे काम जोमाने पुढे नेण्याचे प्रशिक्षण खांबेटे यांनी पुढच्या पिढीला दिले आहे. अलिकडेच आम्हाला त्याची प्रचिती त्यांनी आयोजित के लेल्या एका समारंभात आली होती. अप्पांची ती भेट
शेवटची ठरेल असे वाटले नव्हते. औद्योगिक कें द्र म्हणून ठाण्याची सातत्याने पूर्वापार ओळख होत आली आहे. त्यामागे’टिसा’चेखांबेटे असतील की टीएमएचे आत्मसिंह कपूर यांचा मोठा वाटा होता. या दोघांच्या तालमीत पुढे जे पदाधिकारी तयार झाले त्या सर्वांनी आपापल्या परीने काम पुढे नेले. या दोन आघाडीच्या संघटनांनी उद्योजकांना आत्मविश्वास दिला, आणीबाणीत त्यांच्या पाठीशी उभे राहिले, सरकारशी संवाद साधून त्यांचे प्रश्न चव्हाट्यावर आणले आणि औद्योगिकीकरण अखंडितपणे कसे सुरु राहील हे उभयतांनी पाहिले. या दोघांना जवळून पाहणाऱ्यांपैकी आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्याचा योग आम्हाला आल्यामुळे आम्ही एक नक्की सांगू शकतो की नेतृत्व विश्वासार्ह कसे असावे तर खांबेटे आणि कपूर यांच्यासारखे. निःस्पृहपणे काम के ल्यामुळेच आज उद्योजकांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे आणि मालकीची वास्तू. मंत्र्यांना भेटायला जाताना संपूर्ण गृहपाठ आणि आवश्यक ती कागदपत्रे घेऊन जाण्याची श्री. खांबेटे यांची शिस्त वाखाणण्याजोगी होती. त्यामुळे ते निर्भयपणे आणि आत्मविश्वासाने बाजू मांडत. अशा माणसांना सरकारही गांभीर्याने घेत असते. लघुउद्योजक संघटनेची म्हणूनच योग्य ती दखल घेतली गेली. आज उद्योग क्षेत्रासमोर नवी आव्हाने उभी आहेत. सुरुवातीचा उत्कर्षाचा काळ असताना वेगळ्या समस्या होत्या. त्याला उतरण लागली असताना सारे जग मंदीच्या कचाट्यात सापडले आहे. उद्योजकांना त्याची झळ बसत आहे. जागतिकीकरणामुळे संधीची नवीन दालने उघडली जात असली तरी स्पर्धा आणि मंदी असे दहेरी संकट आ ु वासून उभे आहे. अशा वेळी सरकारने उद्योजकांच्या पाठीशी उभे राहायला हवे. तो दबाव ‘टिसा’ आणत आहे. धोरणात उद्योगस्नेही बदल घडवण्याचा त्यांचा आग्रह असतो. आव्हाने खूप आहेत, ती पेलण्यासाठी उद्योजकांचे प्रतिनिधी सक्षम आहेत कारण ते खांबेटे यांच्या मुशीत तयार झालेले आहेत. एका कृ तार्थ जीवनाची सांगता झाली असे खांबेटे यांचे कार्य पाहून मात्र नक्की म्हणता येईल.