ेशांतर्गत राजकारणात उच्चपदस्थ नेत्यांबद्दल नेहमीच संमिश्र प्रतिक्रिया उमटत असते. सत्तेवर असल्यामुळे विरोधी पक्षाला त्याच्या उणिवा, मर्यादा, अपयश, अपरिपक्वता वगैरे अवगुण दिसत असतात आणि त्यामुळे त्यावर टीके चा भडीमार सुरु असतो. नेता भले चांगला असला तरी विरोधासाठी विरोध करण्याच्या राजकीय स्वभावामुळे तो कायम लक्ष्य बनत असतो. याला विरोधी पक्षाचे नेतेही अपवाद ठरत नाही. सत्तारूढ पक्ष भयापोटी किं वा आकसापोटी विरोधी नेत्यांवर टीके चेआसूड ओढत असतात. त्यांच्यावर गंभीर आरोप करून त्यांना गोवण्याचा प्रयत्न करीत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देशांतर्गत होणाऱ्या टीके च्या पार्भूमीवर श्व त्यांची जी-२० राष्ट्रगटाचे अध्यक्षपद बहाल झाल्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर आंतरराष्ट्रीय संमतीची मोहोर उमटली आहे. अर्थात यामुळे विरोधकांचे आवाज बंद होतील असे नाही, परंतु या बहुमानाचा कसा राजकीय लाभ उठवायचा हे भाजपाशिवाय कोण चांगले करू शके ल? असो. विषय देशाला मिळालेल्या संधीचा आणि त्याबद्दल भारतीय म्हणून आनंद होणे स्वाभाविक आहे. त्याकडे राजकीय चष्म्यातून पाहण्याची गरज नाही. कोणत्याही नेत्याला देशातील सर्वोच्च पदावर पोहोचल्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळावी ही आस असते. ‘लिडर’ आणि ‘स्टेस्मन’ अशा दोन वर्गात नेतृत्वाची विभागणी के ल्यास ‘स्टेस्मन’ होणे कितीही मनात असले तरी तो लौकिक सर्वांना मिळतोच असे नाही. आपल्या देशात १९४७ ते २०२२ या ७५ वर्षात १४ पंतप्रधान मिळाले. त्यापैकी जवाहरलाल नेहरू, श्रीमती इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी यांना ‘स्टेस्मन’ म्हणून बहुमान मिळाला. या मांदियाळीत श्री. मोदी आता जाऊन बसले आहेत. याचा अर्थ उर्वरित १० पंतप्रधान वाईट किं वा सुमार होते असे म्हणता येणार नाही. परंतु त्यांच्या वाट्याला ही आंतरराष्ट्रीय मान्यता आली नाही, हे तितके च खरे. श्री. मोदी यांनी गेल्या आठ वर्षात ठरवून म्हटले तरी चालेल पण अत्यंत खुबीने’स्टेस्मन’ होण्याची महत्वाकांक्षा जपली. त्यादृष्टीने त्यांच्या हालचाली सुरु होत्या. त्यांचा हा हेतू सफल होण्यात त्यांचे वर्तन आणि कर्तृत्व जितके कारणीभूत आहे तितके च परराष्ट्रीय मंत्री जयशंकर यांचेयोगदान. प्रसिद्धीपासून दर राहत देशोदेशी आपले परराष् ू ट्रीय धोरण किती सहिष्णू आणि सर्वसमावेशक आहे असे सिद्ध करून सांगण्याचे काम या जयशंकर यांनी के ले. भारताची अहिंसेची प्रतिमा दर्ब ुलता समजू नका असे ठामपणे सांगताना प्रसंगी जगाला लस पुरविण्याचे काम करून मैत्रीचा नवा अध्याय श्री. मोदी यांनी लिहिला. त्यावर टीकाही झाली. परंतु न डगमगता एका निश्चयाने भारताची उदात्त प्रतिमा श्री. मोदी यांनी निर्माण के ली. विशेष म्हणजे श्री. मोदींची विश्वासार्हता जगाने स्वीकारली. महासत्ता होण्याचे भारताचे स्वप्न थोडे जवळ आले आहे, असे म्हणता येऊ शके ल.