व्हॉट इज युवर कार नंबर?

तुमच्या वाहनाच्या नोंदणी क्रमांकावरून तुमची पत ठरत असते असा एक समज आपल्या देशात दृढ झाला आहे. त्यामुळे ११११, १२३४, ७७७७, ९९९९ वगैरे व्हीआयपी क्रमांक आपल्या गाडीस असावेत याकरिता झुंबड उडत असते. त्यावर मात करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने एक शक्कल लढवली आणि असे क्रमांक पाहिजे असणाऱ्यांना बोली लावून ते विकण्याची पद्धत सुरु झाली. हिमाचल प्रदेशातील प्रादेशिक परिवहन कार्यालय हे ‘९९’ क्रमांकाचे मानकरी आहेत. अलिकडेच एका वाहनचालकाने एचपी ९९-९९९९ हा क्रमांक मिळवला आणि त्यासाठी त्याने एक कोटी १० लाख रुपये मोजले ! हौसेला मोल नसते हेच खरे. एकीकडे अशी उधळपट्टी करणाऱ्या मूठभर लोकांहून कितीतरी पटीने लोक याच देशात उपाशी किं वा अर्धपोटी जगतात हे विदारक सत्य नाकारून चालणार नाही. या गाडीमालकाच्या वाहनाचा नंबर अगदी ३७१३ किं वा ७२१६ असता तर ती धावली नसती का? एवढा खर्च करूनही ती हवेत उडणारच नाही, मग हाच पैसा अन्य कोणत्या सामाजिक कार्यासाठी खर्च झाला असता तर? अनेकांच्या मनात हा प्रश्न डोकावून गेला असेल तर त्यात काही वावगे आहे असे अजिबात म्हणता येणार नाही. अर्थात अप्रत्यक्षपणे त्याने सरकारी
तिजोरीतच पैसा जमा के ला आहे. त्यामुळे त्याचा लोककल्याणासाठी वापर होईल असे वाटते. पण तरी एक प्रश्न मनात गुंजी घालत राहतोच, अशी काय किमया असते अशा आकर्षक आणि जादई ु क्रमांकांना. गाडीचा क्रमांक तुमचे समाजातले स्थान ठरवत असते असा एक भाबडा समज एक विशिष्ट क्रमांकाच्या हट्टामागे असतो. अर्थशून्य क्रमांक ‘कोणालाही’ मिळतो परंतु अर्थपूर्ण क्रमांक मिळवण्यासाठी तुम्ही प्रतिष्ठित असल्याचा भास निर्माण करता येतो. तुमची ऊठ-बस मोठ्या लोकांत आहे असाही एक अर्थनिघतो. ‘अशा’ क्रमांकाच्या गाड्यांना असंख्य सवलती असतात. तशी त्यांना कारवाईची भीती नसते. तुमची गाडी ‘व्हीआयपी’ समजली जाते आणि तिला वाहतुकीचे नियम मोडण्याची आपसूक परवानगी मिळत असते. त्यांच्या काचा काळ्या असल्या तरी पोलीस त्याकडे दर्ल ु क्ष करीत असतात. सिग्नल तोडणे वगैरे हे गुन्हेी त्यांना माफ असतात ! एवढे सारे फायदे असताना थोडी (?!) पदरमोड झाली तर बिघडते कु ठे ? हा उदात्त विचार आणि मनाची श्रीमंती दाखवली तर टीका का करा ?
सर्वसामान्य जनतेलाही व्हीआयपी क्रमांकांवर आक्षेप नाही. परंतु त्यांच्यासाठी वेगळे नियम असावेत हे त्यांना मंजूर नाही. आमच्या मते व्हीआयपी गाडीवाल्यांनी आपल्या जादई क्रमांकाला साजेशी- ु जबाबदार वर्तणूक के ली तर ते खऱ्या अर्थाने जनतेच्या मनात आदराचे स्थान मिळवू शकतील. अन्यथा व्हीआयपी नंबर पाहून जनतेच्या कपाळावर आठ्याच उमटत असतात.