सत्तारुढ पक्षाच्या आमदाराने हात-पाय तोडण्याची वा कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणे निर्विवाद असमर्थनीय आहे. त्याबद्दल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेद व्यक्त करण्यात काहीच गैर नाही. परंतु आमदारांनी संयम बाळगावा, सज्जनता जपावी वगैरे सुविचार सत्तेत असताना अनेकदा सुचत नाहीत. त्यामुळे श्री. पवार यांनी व्यक्त के लेल्या प्रतिक्रियेवर त्यांचे विरोधक टीका करतील. अशा विधानांनंतर होत असलेले राजकारण आक्षेपार्ह वर्तनास अप्रत्यक्षपणे पाठीशी घालत असतात हे कोणी समजून घेणार आहे की नाही. सत्तेची मस्ती-माज असतो. तो सर्वपक्षीय असतो हे आपण लक्षात घेतले तर जेव्हा अशी वादग्रस्त विधाने होत असतात तेव्हा सर्वपक्षीयांनी मतभेद बाजूला सारुन त्याची गंभीर दखल घ्यायला हवी. महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपणाचे दाखले द्यायचे, यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या अत्यंत सुस्वभावी नेत्याचा उल्लेख करायचा परंतु प्रत्यक्षात गावगुंडासारखे वागायचे याला दांभिकपणा नाही म्हणायचा तर काय? श्री. अजित पवार यांनी व्यक्त के लेला संताप योग्य आहे आणि किमानपक्षी त्यांच्या पक्षातील आमदार, नगरसेवक किं वा कार्यकर्ते तोल जाऊ देणार नाही याची काळजी घ्यायला लावतील. सत्ता आली की आपले कोणी वाकडे करु शकणार नाही, हा ठाम गैरसमज नेत्यांना बेताल होण्यास प्रवृत्त करतो. आपण कायद्याच्या वर आहोत, गुन्हा के ला तर सर्वसामान्यसारख्यांप्रमाणे शिक्षा होण्याची भीती नाही या विचारांनी नेतेमंडळी जिभेचे हाड आणि बुध्दी गहाण टाकीत असतात! ज्या जनतेकडे निवडणुकीत आपण मते मागायला जातो, त्या याचकाच्या भूमिके चा इतका सहज विसर का पडतो, हा संशोधनाचा विषय आहे. सत्तेची नशा इतकी पटकन् भिनतेच कशी याचे उत्तर राज्यातील बुजुर्ग नेतेच देऊ शकतील. पण ते काय असेल हे जनतेला चांगले ठाऊक झाले आहे. प्रशासनातील बडे अधिकारी आणि पोलिस स्थानके आपल्या खिशात असल्याच्या आविर्भावात काही पुढारी वावरत असतात. त्यांची संख्या वाढू लागली आहे, ही चिंतेची बाब नेत्यांचे शरीरसौष्ठव पहाता ती जणू राजकारणात प्रवेश करण्याची मुख्य अट असावी असे वाटते. आमचे त्याबद्दल दमत न ु ाही. नेत्याला चांगले व्यक्तीमत्व असल्यास त्याच्या नेतृत्वगुणाला ते पुरकच ठरेल. परंतु दररोज शारीरिक व्यायाम करुन तंदरुस्ु ती कमवणाऱ्या नेत्यांनी प्रसंगी बौध्दिक संपदा मिळवण्याकरिता काही वेळ घालवला तर भाईगिरी, दादागिरीमुळे बदनाम होत चाललेले राजकीय क्षेत्र जनतेच्या आदरास आणि सहानुभूतीस पात्र ठरेल! आपले आचार, विचार, देहबोली, रहाणीमान आदी बाबीही आपली प्रतिमा उजळत असतात, हे सांगण्याची वेळ राज्यातील सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांवर आली आहे. परंतु प्रत्यक्षात असे गुंड कार्यकर्ते आणि त्यांचे उपद्रवमूल्य नसेल तर नेत्यांनाच असुरक्षित वाटू लागते हे कटू वास्तव नाकारता येणार नाही. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील दोन प्रमुख नेते त्यांच्या स्थानिक कार्यकर्त्याचे अभिरुचिहीन आणि सुसंस्कृतपणाला सोडून सुरू असलेल्या भाषणास प्रोत्साहन देताना आपण पाहिले. अशा वेळी हात-पाय तोडणे, कोथळा वगैरे शब्द चलनात राहणारच. दात विचकवणाऱ्या त्या दोन्ही नेत्यांना राज्यातील तथाकथित बुजुर्ग नेत्यांना जाबही विचारला गेला नव्हता! आता अशा बेताल नेत्यांना कोणाची फू स असते याचे सर्वपक्षीय नेत्यांनी आत्मपरीक्षण के लेले बरे!