येऊरच्या जंगलातील बिबळे अधूनमधून ठाण्याच्या मानवी वस्तीत प्रवेश करीत असल्याच्या बातम्या आपण मोठ्या चवीने आणि काहीशा भीतीमिश्रित कु तुहलाने वाचत असतो. ज्या भागात बिबळे दिसतात तेथील नागरिकांची झोप उडत असते. आदिवासींवर हल्ला करणे, प्रसंगी त्यांची गाई-गुरे पळवून नेल्याच्या घटना ताज्या आहेत. काही वर्षांपूर्वी समतानगर सारख्या गजबजलेल्या वस्तीतील एका बंगल्यात दिवसभर मुक्काम ठोकू न बिबळ्यांनी सर्वांचीच झोप उडवली होती. यथावकाश बिबळे धाडसी होत गेले आणि एकदा तर पूर्वद्तगती मह रु ामार्ग ओलांडून खोपट भागातील बाटा कं पाऊं डमध्ये एका गोदामात तो लपून बसला होता. घोडबंदर महामार्ग ओलांडून नव्या संकु लात, कधी बंद कारखान्यांच्या आवारात बिबळे आढळत असत. यामुळे घुसखोरी कोणाची, बिबळ्यांची की मानवाची, असा प्रश्नही चर्चाविश्वात फे र धरु लागला. अर्थात पर्यावरणवादी आणि शहरीकरणाचे समर्थन करणारे यांच्यात याबद्दल आजही एकमत नाही. परंतु एक गोष्ट तितकीच खरी की बिबळ्यांमुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानावर चारही बाजूंनी सुरु असलेले बेकायदा बांधकामांचे आक्रमण आटोक्यात राहिले. मानव विरुध्द पशूजीवन यांच्यातील हा संघर्ष निर्णायक स्थितीला कधी पोहोचला तर त्यात बिबळ्यांचाच पराभव होणार हे कटू सत्य नाकारता येणार नाही. तसे होऊ नये यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. हे भान आले नाही तर चित्त्यांप्रमाणे बिबळेही आपल्याला आयात करण्याची पाळी यायची. हा विषय लिहिण्याचे कारण एकू ण आठ चित्ते (पाच माद्या, तीन नर) शनिवारी पहाटेपर्यंत आफ्रिके तील जंगलातून आठ हजार कि.मी.विमानाचा प्रवास करुन भारतात डेरेदाखल झाले असतील. ही पर्यावरणावर प्रेम करणाऱ्यांसाठी लक्षवेधी आणि ऐतिहासिक घटना आहे. त्यासाठी खास विमानात फे रफार करण्यात आले असून पशूवैद्यक अधिकाऱ्यांचा एक चमू या चित्त्यांबरोबर असणार आहे. दक्षिण आफ्रिके तील नामिबिया प्रांतातील जंगलात हजारावर चित् आहेत. ते त्यापैकी 77 टक्के चित् हे ते निर्बंध क्षेत्राबाहेर म्हणजेच मानवी वस्त्यांजवळ राहतात. वाघ, सिंह किं वा बिबळे यांच्यापेक्षा तुलनेने चित्ते कमी हिंस्त्र असतात म्हणून ते त्यांच्या आवास-क्षेत्राबाहेर राहतात काय? तर तसेही म्हणता येणार नाही. मानवी वस्त्यांमध्ये, शेतात येऊन चित्तेप्राण्यांची शिकार करीत असतात. परंतु त्यांच्याबाबतीत स्थानिक आक्रमक होत नसतात. या नागरिकांना चित्त्यांबाबत कोणता पवित्रा घ्यावा याचे शिक्षण दिले जात असते. त्यांच्यात अशी जागृती असल्यामुळे घुसखोरी कोणाची अशी चर्चासत् वरे ा वादविवाद रंगत नाहीत. यासाठी चित्त्यांच्या हालचालींना मानवी वस्तीत निर्बंध घालण्यासाठी त्यांच्या उदरभरणाची व्यवस्था जंगलातच के ली जाते. हे सारे मुद्दे येऊरच्या बाबतीत प्रकर्षाने चर्चेच्या ऐरणीवर येतील. येऊरच्या डोंगरातून बोरिवलीकडे रस्ता काढण्याचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीतून माणसाची मुक्ती होईलही. प्रवासाचा वेळ लक्षणीय कमी होईल. परंतु बिबळे बेघर होतील त्याचे काय? नियोजनकर्त्यांनी नामिबियात विकास प्रकल्प पर्यावरणाचा समतोल करुन कसे राबवले जातात याचाही अभ्यास करावा.