स्मार्ट शहरांची निर्ती करत मि ाना शहरातील गरजा आणि समस्या जाणून घ्याव्यात असा सूर स्वीडनभारत स्मार्ट सिटी अॅण्ड इनोव्हेशन रोड शो कार्यक्रमात तज्ज्ञांनी काढला. तो यथोचितच म्हणावा लागेल कारण सध्या स्मार्ट-सिटीच्या नावाखाली जे प्रकल्प हाती घेतले गेले आहेत, त्यापैकी काहींबाबत प्रश्नचिन्ह निर्माण के ले जात आहे. या प्रकल्पांची आताच गरज होती काय किं वा यापेक्षा अमका प्रकल्प हाती घेतला गेला असता तर बरे झाले असते अशी चर्चा वारंवार ऐकू येत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत देशातील शंभर शहरांत ‘स्मार्ट-सिटी’ योजना राबवण्याचा कार्यक्रम जाहीर के ला. त्यामुळे जागतिक दर्जाच्या प्रमुख शहरांशी भारतातील शहरे टक्कर देतील आणि जागतिकीकरणाच्या रेट्यात भारताचे स्थान या बाह्य बदलांमुळे ठसठशीत दिसेल हा या महत्वाकांक्षी योजनेचा हेतू आहे. पायाभूत सुविधांनी शहरे सक्षम करता-करता त्यांचे सुशोभीकरण करणे असा दहेरी हेतू य ु ा योजनेत सामावलेला आहे. प्रत्यक्षात अनेक शहरांतील प्रमुख समस्यांचे निराकरण
होण्यापेक्षा त्याकडे लक्ष न देता ही शहरे सजवण्याचे काम सुरु असते. रस्त्यांचे रुं दीकरण, पुलांची बांधकामे, प्रशस्त चौक, नाले बंद करणे, ही कामे महत्वाची असली तरी
त्यांच्या प्राधान्यक्रमात गल्लत होत असते. त्यामुळे रस्तेरुं द झाले तरी पार्किं ग धोरणाची अंमलबजावणी न झाल्यामुळे तो प्रकल्प जनतेच्या पसंतीस उतरत नाही. ठाण्याचेच उदाहरण घ्यायचे झाले तर जवळजवळ सर्वच पुलांखाली बेकायदा पार्किं ग झाले आहे. पुलाच्या तोंडाशी किं वा उतरताना एखादे गॅरेज गाड्यांच्या दरुु स्तीसाठी रस्ता व्यापत आहे. पदपथ आहेत, पण अतिक्रमणेही आहेत. भिंतींची रंगरंगोटी झाल्यामुळे शहर देखणे झाले यात वाद नाही, परंतु सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी प्रसाधनगृहे नाहीत. पुरुषांची प्रसाधनगृहे अस्वच्छ असतात. तलावांचे सौंदर्यीकरण झाले पण भेळीच्या गाड्यांनी त्याला गालबोट लागले आहे. जांभळी नाका असो की मीनाताई ठाकरे चौक येथे सुशोभीकरणाला जाहिरात फलकांचे ग्रहण लागलेले असते. डंपिंग ग्राउंडवरून बराच धुरळा उडतो, तो बसत नाही तोवर कचऱ्याचे ढीग अधूनमधून दर्शन देतात आणि ते हटवण्यासाठी कचऱ्याच्या गाड्या भर कामाच्या वेळेत वाहतूक कोंडी करून अडचणीत भर घालतात. जांभळी नाक्यावरील भाजीमंडईचे ट्रक स्शटे न रोड व्यापतात आणि चाकरमानी हतबल होऊन स्शटे नवरून येणाऱ्या रिकाम्या पुलाकडे पाहत राहतात. याला स्मार्टपणा कसे म्हणता येईल? आमची आयुक्तांना एकच विनंती आहे की स्मार्टसिटीची योजना जनतेसमोर पुनश्च मांडावी आणि त्यांचेही मत अजमावून घ्यावे. तेव्हा शहर स्मार्ट झाले असे म्हणता येईल.