कुत्रा, माणूस आणि न्यायालय

कायद्याची भाषा किचकट असते आणि न्यायालय कसे विचार करते, हेही अनेकदा अनाकलनीय असते. न्यायालयीन भाषा सर्वसामान्यांना अनेकदा कळतही नाही.परंतु
जनतेच्या मनातील विचार न्यायालयाच्या मुखातून निघतात तेव्हा मात्र जनतेला सुखद धक्का बसत असतो. नागपूरच्या न्यायालयात भटक्या कु त्र्यांवरची सार्वजनिक हीत याचिका सुनावणीस आली, तेव्हा या गोष्टीची प्रचिती आली. भटक्या कु त्र्यांचा उपद्रव खातरजमा करण्यासाठी आपण स्वतः पहाटेच्या वेळी शहरात फे रफटका मारला होता, असे महापालिके च्या पशु वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगून याचिके त तथ्य नसल्याचे मत मांडले. त्यावर न्यायमूर्तींनी रात्री फिरले पाहिजे, असे संबंधित अधिकाऱ्याचे कान टोचल्यावर ते नक्कीच निरुत्तर झाले असणार! त्यांच्या लंगड्या बचावाची हवाही निघून गेली असणार. भटक्या कु त्र्यांची समस्या सर्वत्रच वाढू लागली आहे आणि त्याबद्दल समाजात अनेकदाभांडण-तंटे होऊ लागले आहेत. पशूप्रेमी मंडळी हिरीरीने मानवतावादाचा मुद्दा उपस्थित करून महापालिका अथवा भटक्या कु त्र्यांविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांविरुद्ध दंड थोपटत असतात. अनेकदा त्यांचे म्हणणे बरोबरही असते, परंतु एखाद्या बेसावध क्षणी हेच कुत्रेहिंस्त्र होतात, तेव्हा मात्र पशुप्रेमी मंडळी सोयीस्कररित्या मौन धारण करत असतात. पशुंवर प्रेम करणारे आपल्याच बांधवांबद्दल इतके बेपर्वा कसे राहू शकतात, हा विचार खदखदणाऱ्या संतापाच्या मूळाशी असतो. गेल्या काही वर्षांत लहान मुलांचे लचके तोडल्याचे निर्घृण प्रकार कितीतरी घडले आहेत आणि त्याबद्दल समाजात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या घटनांची मात्र योग्य दाखल घेतली जात नाही, असा मतप्रवाहही उमटताना दिसतो. न्यायालयाने याच भावना एक प्रकारे व्यक्त के ल्या आहेत. भटक्या कु त्र्यांना अन्नपुरवठा करणारे अनेक पशूप्रेमी गावागावांत दिसत आहेत. त्यांच्या या कृतीबद्दल आक्षेप व्यक्त होत असतो, परंतु त्यांच्या बाजूने कायदा नसल्याने हे प्रकार सर्रास सुरू आहेत.
महापालिके तर्फे अशा कु त्र्यांची नसबंदी करण्याचा मार्ग अवलंबला जातो, मात्र त्यासही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही, परिणामस्वरूप कु त्र्यांवरून समाजातील तेढ वाढतच चालली आहे. याची जाणीव बहुदा न्यायालयाला झाली असावी, म्हणून त्यांनी पशूवैद्यकीय अधिकाऱ्याची कानउघडणी के ली असावी असे वाटते. पशूंबाबत दष्टुपणाने वागावे असे समाजाचे अजिबात मत नाही. परंतु आपणच मुक्या जनावरांचे कैवारी आहोत हा अट्टाहास असेल तर तो सार्वजनिक जीवनातील सहिष्णुतेला नक्कीच धरून नाही. परंतु पशू हल्ला करणार नाहीत, याची हमी कोण देईल याचे उत्तर कोणाला कधीतरी द्यावे लागेलच. याबाबत खरे म्हटले तर सामाजिक जबाबदारी आणि आपल्या बांधवांबद्दल काळजी याचा विचारही भूतदया दाखवणाऱ्यांना करावाच लागेल. नागपूरच्या न्यायालयात झालेली ही सुनावणी भटक्या कु त्र्यांबाबत एक वेगळा विचार आणि कायमस्वरूपी तोडगा निघेल अशी आशा दाखवतो.