कोरोना काळात माध्यमांनी बजावलेल्या भूमिके बद्दल आक्षेप नोंदवले गेले. संमिश्र अशा या प्रतिक्रियांत माध्यमे बेजबाबदारपणे वागली असा बहुसंख्यांचा रोख होता. या
क्षेत्रात जबाबदारीने काम करणाऱ्या अनेकांना समाजाची ही प्रतिक्रिया खटकली असण्याची शक्यता आहे. अपवाद म्हणून का होईना माध्यमातील काही मंडळींनी चांगली कामगिरी बजावली होती हेनाकारून चालणार नाही. एकु णातच अचानक आलेल्या आपत्तीमुळे सर्वच स्थरांत गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण असल्यामुळे माध्यमेही बिथरणे स्वाभाविक होते. जसजसेया रोगावर औषधोपचाराला चांगला प्रतिसाद मिळत गेला तसेगोंधळ कमी झाला. यथावकाश भीतीही लोप पावू लागली.
आरोग्य यंत्रणेलाही योग्य मार्ग सापडला आणि परिस्थिती दोन वर्षांनी का होईना पूर्वपदावर आली. सुटकेचा निःश्वास टाकला जात असताना कोरोनाच्या उगमस्थानी
अर्थात चीन येथेपुन्हा साथ पसरल्याच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या आहेत. त्यापाठोपाठ राजधानी दिल्लीत एकाच शाळेत १३ बाधित विद्यार्थी आढळल्यामुळे
सरकारने तातडीनेशाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. माध्यमांनीही या बातम्या ठळकपणे प्रसिद्ध के ल्या. आता माध्यमांचेआणि प्रशासनाचेहे वर्तन योग्य की अयोग्य असा मुद्दा उपस्थित होत आहे. कोरोनाकडेकसे पाहिलेजावेयाचेभान आज उभयतांना आलेले दिसत नाही. सनसनाटी निर्माण करण्यासाठी शेकडो बातम्या असताना माध्यमांनी कोरोनाचीच निवड का करावी हा प्रश्न आहे. ही अपरिपक्वता फाजिल उत्साहातून निर्माण होत असतेआणि आपल्या बातमीचा किती खोलवर परिणाम होईल हा समंजसपणा दाखवला जात नाही. कोरोनाच्या पहिल्या आणि दसऱ ु ्या लाटेच्या वेळी ज्या चुका माध्यमेआणि प्रशासन यांनी के ल्या त्यांची जणूपुनर्रावृत्ती सुरू झाली आहे. त्याला वेळीच आळा घालावा लागेल. बातमीची सत्यता पडताळणे हेचांगल्या पत्रकाराचे लक्षण असते. आपल्या बातमीमुळे समाजाचेनुकसान होणार असेल
तर ती प्रसिद्ध करण्यापूर्वी विचार करायला हवा. कोरोनाची तीव्रतावाढण्यामागेयोग्य मात्रेचा अभाव हेकारण असले तरी परिपक्वतेच्या मात्रेचा संपूर्ण अभाव हेखरे कारण होते, भीतीमुळेदगावलेल्या रुग्णांचेप्रमाण अधिक होतेअसेआता बोललेजात आहे. तसे पुन्हा होऊ नयेयाकरिता पत्रकारांनी काही निर्बंध घालून घ्यायला हवे. ही वेळ भीती पसरवण्याची नाही, तर दोन वर्षांनी पुन्हा बाहेर पडून आयुष्य उभारण्याची आहे. माध्यमांनी मोह आवरावा आणि आपल्या मूळ उद्देशास हरताळ फासूनये.