काय चाललंय?

महाराष्ट्रातील राजकारणात धगधगणारा संघर्ष काही के ल्या शमण्याची शक्यता दरु्मिळ होत असल्याचे आ. जितेंद्र आव्हाड यांच्यांविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने स्पष्ट होत आहे. हर-हर-महादेव चित्रपटावरुन सुरु झालेला वाद, पुढे आव्हाड यांच्या अटके मुळे चिघळू लागला आणि त्यांना जामीन मिळाल्यावर ठाण्यात एका
उद्घाटनप्रसंगी आव्हाड पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकले. एका महिला पदाधिकाऱ्यास स्वत: बाजूला सारणे विनयभंगांचा प्रकार ठरु शकतो काय असा प्रश्न उपस्थित करुन आव्हाड यांनी लक्ष्य करण्यात आले.उद्विग्न झालेल्या आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा पक्षनेतृत्वाकडे सुपुर्द के ला आहे. यावरुन महाराष्ट्रात वादंग उडाला असून उभय पक्ष आपली कृ ती कशी योग्य हे सांगण्याचा प्रयत्न सुरु आहे. यामुळे आव्हाड यांचे नुकसान तुलनेने कमी होऊन सत्तारुढ पक्षावर मात्र गुन्हा दाखल करण्याची कृ ती योग्य असल्याचे समजावून सांगण्याचे उत्तरदायित्व वाढते. त्यामुळे अशा उप-घटनांचे रुपांतर मोठ्या घटनांमध्ये होणार नाही हे पाहिले जायला हवे. वाद
कशावरुन सुरु झाला, वातावरण कशामुळे गढूळ झाले, या बाबींमागे एक बाब नक्की आणि ती म्हणजे सत्तांतर झाले असले तरी वर्चस्व मान्य करण्याची मानसिकता नसणे! महाआघाडी सरकारच्या काळात तत्कालिन विपक्ष ज्या मानसिक सापळ्यात अडकला होता तसाच काहीसा प्रकार मागील पानावर पुढे या न्यायाने सुरू आहे, असे वाटते. आ. आव्हाड यांच्या समर्थनार्थ महिला संघटना उभ्या राहिल्या आहेत. ज्या विरोधात आहेत त्यांनी कथित विनयभंगाच्या कारवाईचे समर्थन के ले आहे.
महिलांना राजकारणात कशी वागणूक मिळते आणि तिला सामोरे जाताना कसा लढा द्यावा लागतो हे अलिकडेच भाजपाच्या नेत्या श्रीमती चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत दाखवून दिले होते. महिला एकाकी पडलेल्या दिसतात आणि पुरुषप्रधान संस्कृतीत त्यांना स्वत्व सिद्ध करण्यासाठी झगडावे लागत आहे. एकीकडे महिलांच्या समान हक्काची भाषा बोलायची आणि दसरीकडे खेडोपाडी राजरोसपणे, ु प्रसंगी नेत्यांकडूनही, होणाऱ्या अत्याचारांकडे डोळेझाक करायची, हा दटप्ु पीपणा सर्रास दिसू लागला आहे. त्या-त्या वेळी आपल्याच नेत्यांना पाठीशी घातले गेले, हे कटू सत्य नाकारता येणार नाही. ही सर्वपक्षीय विकृ ती महाराष्ट्राने पाहिली. राजकारण्यांच्या अशा वर्तनामुळे जेव्हा एखादी घटना अवघ्या राज्याचे लक्ष वेधून घेते आणि चर्चाविश्वात स्थान मिळवते, तेव्हा या सर्व नेत्यांनी आपल्या भूमिका तपासून घ्यायला हव्यात. राजकारण्यांचा दांभिकपणा अं गवळणी पडलेल्या समाजाच्या अपेक्षांचा विचार नेत्यांनी सद्सद्विवेक बुद्धी जागी ठेऊन करायला हवा. आव्हाडांना शह देण्यासाठी
त्यांच्याविरोधात हे प्रकरण वापरले जात असेल तर राजकारणात खरे मुद्दे संपले की काय असा प्रश्नही विचारला जाऊ शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आजपर्यंतची
राजकीय कारकीर्द जवळून पाहाणाऱ्यांना या घटनांचा आणि त्यांचे भांडवल करण्याच्या प्रयत्नांबद्दल आश्चर्यवाटू शकते. संयत, संयमी आणि समन्वयाला प्राधान्य देणाऱ्या श्री. शिंदे यांनी अशा घटना वेळीच थांबवण्याची गरज आहे. ते त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे ठरेल. मुख्यमंत्री म्हणून त्यांची बरीच शक्ती आणि वेळ वाया जाणे खटकते. हे मत नोंदवताना सार्वजनिक ठिकाणी अति-उत्साह न दाखवण्याचे पथ्य पाळण्याची गरज विषद करावी लागेल. त्यामुळे मनःस्ताप ओढावून घेण्याची वेळ आली. आपल्या
विधानांचा आणि हालचालींचा कोण कसा अर्थ काढेल याचा विचार सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला करायलाच हवा. पुरोगामी महाराष्ट्र ही विचारधारा स्वीकारत आली आहे. तिचे अनुकरण हीच काळाची गरज आहे.