आनंदाने ‘नाटू नाटू’ !

जागतिकीकरण आणि जोडीला झालेली माहिती तंत्रज्ञानाची चक्रावून सोडणारी प्रगती यामुळे मानवाच्या जाणिवांना व्यक्त होणे सुलभ झाले आहे. साध्या मोबाईलपासून उपग्रहांच्या मदतीने सारे विश्व हाताच्या पंज्यात मावू लागले आहे. अशा वेळी के वळ माहितीची देवाणघेवाण जलदगतीने होत नसून सृजनशीलतेला अं कु र फु टले आहते आणि अशी अभिव्यक्ती पहाणे, पारखणे, प्रशंसित करणे खूप सेापे झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या वाट्याला आलेले दोन पुरस्कार या सर्व घडामोडींचाच परिपाक
आहे असे म्हटले तर वावगे ठरु नये. आरआरआर चित्रपटातील ‘नाटूनाटू’ या गीतासह ‘एलिफन्ट व्हिस्परर’ या माहितीपटाने अत्यंत प्रतिष्ठेचा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. भारतीय चित्रनिर्मिती विश्वात त्यामुळे आनंदाचे वातावरण पसरले असून आगामी काळात भारतीय चित्रपटांकडे बघण्याचा परीक्षक आणि पाश्चात्य चंदेरी दनुियेचा
दृष्टीकोन बदलणार आहे. नाटूनाटू गाण्यासाठी संगीतकार एम.एम.किरवानी आणि गीतकार चंद्राबोस यांना ऑस्कर मिळाला आहे. माहितीपटाच्या दिग्दर्शिका कार्तिकी गोन्साल्वीस आणि निर्मात्या गुनीत मोंगा यांनी पुरस्कार स्वीकारला. माहितीपटाचे असे एक अनोखे विश्व असते आणि त्या प्रांतात भारताने दाखवलेली चुणूक या क्षेत्रात काम करु इच्छिणार्या लहान-मोठ्या दिग्दर्शकांना प्रोत्साहन देऊन जाईल. ‘गांधी’ चित्रपटातील वेशभूषेसाठी भानु अथय्या (1983), ख्यातनाम दिग्दर्शक सत्यजित राय यांना
(1992), गुलजार-रेहमान यांना 2009 मध्ये संयुक्तपणे आणि ‘स्लम डॉग मिलिनिअर’ चित्रपटाच्या ध्वनी संकलनासाठी रेसुल पूकु ट्टी यांना ऑस्कर मिळाले आहते . भारतीय चित्रकर्मींच्या कामगिरीत यंदाच्या पुरस्काराने ही मालिका अखंडीत ठेवली आहे. जागतिकीकरणाच्या जमान्यात अर्थ-व्यवसाय, तंत्रज्ञान-विज्ञान आदी क्षेत्रांप्रमाणे सांस्कृतिक देवाणघेवाणही मोठ्या प्रमाणात झाली. भारतीय लेखकांची पुस्तके परभाषेत अनुवादित होऊन जागतिक ग्रंथविश्वात सामावली गेली आणि भारतीयांनाही जगाच्या काना-कोपऱ्यातील संवेदनांची जाणीव करुन देणारी पुस्तके उपलब्ध झाली. इंटरनेटच्या माध्यमातून देशांच्या सीमा पुसल्या गेल्या आणि व्यक्त होण्याच्या उपजत मानवीवृत्तीला अनुकू ल असे वातावरण तयार झाले. या क्षेत्रात अब्जावधी रुपायांची उलाढाल होत असल्यामुळे दर्जा टिकविण्यासाठी देशोदेशातील कलाकार-लेखकदिग्दर्शक-संगीतकार-गीतकार -अन्य तंत्रज्ञ कष्टांची पराकाष्टा करु लागले. भारतातील दक्षिणेकडचे चित्रपटविश्व देशातील अन्य प्रांतांच्या तुलनेत अधिक प्रगल्भ आणि तांत्रिकदृष्ट्या आधुनिक झाले आहे. तिथला ‘प्रोफे शनलिझम’ वाखणण्याजोगा असतो. गेल्या वर्षी दक्षिणेकडील चित्रपटांनी दोन हजार कोटींची उलाढाल करुन हिंदी चित्रपटसृष्टीला मागे टाकले. चित्रपटांची संहिता आणि त्याचे सादरीकरण यास ऑस्कर मिळाल्यामुळे वैश्‍विक मान्यता मिळाली आहे. त्यांच्यासाठी ही अभिमानाची बाब असून अन्य ठिकाणचे चित्रपटकर्मी यांचा उत्साह वाढवणारी आहे. हा क्षण सर्वांनीच ‘नाटू नाटू’ तालावर नाचत स्वागत करायला हवा.