दो न-चार वर्षांपूर्वी व्हॅलेंटाईन डे हा आंदोलनासाठी साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त झाला होता. या दिवशी तरुणाईला प्रेमाचे भरते जितक्या तीव्रतीने येते त्यापेक्षा कितीतरी पटीने या पाश्चात्य रितीविरुद्ध उद्रेक पेटत असे. व्हॅलेंटाईन डे ची शुभेच्छा कार्ड किं वा भेटवस्तू विकणाऱ्या दकानदारांच् ु या मनात इतकी दहशत बसली होती
की दकाने बंद ठे वण् ु याचा निर्णय ते घेत असत. दकाने बंद ु का ठे वली असे पत्रकारांनी विचारले तर उत्तर येत असे अहो आम्हाला अमक्या-अमक्या नेत्याने प्रेमाने सांगितले म्हणून! काहीजण नेत्यांचे नाव सांगून लचांड मागे का लावून घ्या, या विचाराने हिंद संस्कृ ू तीबद्दलच्या प्रेमाचा हवाला देऊ लागले. प्रेमबीम यासारख्या सवंग संकल्पनांना खतपाणी मिळणार नाही याचा चोख बंदोबस्त ठे वला जात असे. पुलाखालून पाणी वाहतच असते आणि आक्रमक नेत्यांनाही अशा आंदोलनांना काही अर नाही, उलटप ्थ क्षी घरातील तरुण पिढीच खिल्ली उडवायला लागल्यामुळे असेल ‘व्हॅलेंटाईन डे’ ला पुन्हा सुगीचे दिवस आले. आता तर पक्षांतर करण्यासाठी या मुहूर्ताचा उपयोग का करू नये अशी कल्पनाही काही नेत्यांच्या मनात आली तर आश्चर्य वाटू नये. प्रेमाच्या देवाण-घेवाणीसाठी राजकीय क्षेत्र तरी कसा अपवाद ठरावा?
मंगेश पाडगावकर आणि समस्त कवी मंडळींनी प्रेमावर खूप कविता लिहिल्या, भावगीते लिहिली. तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर व्हॅलेंटाईन डे नव्हता. प्रेमाच्या उत्कट भावना अमावस्या-पौर्णिमेला किं वा भरती ओहोटीच्या नैसर्गिक प्रक्रियेतून स्फूरत नव्हत्या. अमावस्येला तरल चंद्रप्रकाशात आणि टपोर चांदण्यात प्रेयसीचा चेहरा आमच्या गीतकारांना दिसत असे. प्रेम ही जाहीर आणि जाहिरात करण्यासारखी गोष्ट आहे हे ते मानत नव्हते. प्रेमात पडलेल्या दोन जीवांची नजरानजर झाली तरी प्राजक्ताचा सडा पडून समोर वातावरण प्रेममय होऊन जात असे. साऱ्या जगाला ऐकू जाईल अशी ललकारी देऊन प्रेम व्यक्त के ले जात नसे तर डोंगरात एकमेकांचे हात धरून अनवट वाटेवरून फक्त पाचोळ्यांचा आवाज करीत प्रेमयुगुल चालत असत. प्रेमाच्या आणाभाका अत्यंत हळू आवाजात घेतल्या जात. सध्या हे काम डीजेच्या मार्गदर्शनाखाली कर्कश आवाजात होत असते. व्हॅलेंटाईन डे असेल पाश्चात्य संस्कृतीचा भाग. आपला त्याला विरोध का बरे असावा? पण म्हणून आपली प्रेमाची रीत, संस्कृती आपण मोडीत का काढावी? हा खरा प्रश्न आहे. आमच्या मते समाजात प्रेमाची भावना कमी कमी होत असताना सर्व समाजाने मतभेदांच्या आणि गैरसमजांच्या
भितं ी पाडून प्रेमाचे पूल बांधायला हवे. त्यासाठी मुहूर्ताची गरज नाही. मनात येणारा तो उत्कट क्षण हाच मुहूर्त मानावा. मग ३६५ दिवस व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याचा आनंद मिळेल !