रस्ता सुरक्षितता….

वाहनांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. सार्वजनिक वाहतुकीचा अभाव आणि आर्थिक सुबत्ता ही त्यामागची दोन प्रमुख कारणे आहेत. वाहनांच्या तुलनेत रस्ते तर अपुरे पडत आहेत आणि त्याची प्रचिती दिवसातून कोणत्याही वेळी किमान एकदा तरी प्रत्येक नागरिकाचा काही अमूल्य वेळ आणि त्याहूनही मौल्यवान इं धन वाया जात आहे. वाहतूक कोंडीत आपण अडकू नये म्हणून जो-तो ती फोडण्याचा आपल्या परीने प्रयत्न करीत असतो आणि त्यातून वाहनचालकांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होऊ लागल्याचे दिसते. याचा परिपाक रस्ते अपघातात होऊ लागला आहे आणि हे प्रमाण चिंतेचे आहे. दर 36 तासांनी एक मृत्यू आणि दररोज किमान दोघे जखमी होणे हे सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. रस्त्यांवरील अपघात कमी व्हावेत या हेतूने पोलिसांचा वाहतूक विभाग रस्ता सुरक्षा अभियान राबवत असते, जसे अन्य सरकारी उपक्रमांचे असते. उदाहरणार्थ सौजन्य सप्ताह, भ्रष्टाचारविरोधी मोहीम वगैरे तसेच सुरक्षा अभियानाचे होत असते. एका निर्दिष्ट वेळेपुरते हा कार्यक्रम राबवला जात असतो आणि वर्षाच्या उर्वरित काळात या अभियानाच्या निमित्ताने व्यक्त झालेले विचार, सोडलेले संकल्प, घेतलेल्या शपथा, जनजागृती वगैरे
अल्पकाळापुरत्या रहातात. अभियान संपले की पुन्हा कोंडी, पुन्हा अपघात, पुन्हा रस्त्यांवरील वाद, पुन्हा बेशिस्त हे सुरु रहाते. सध्या सुरु असलेले अभियान आणि आतापर्यंतची अनेक वर्षांपासूनची अभियाने यांचा तुलनात्मक अभ्यास के ला तर परिस्थिती अधोगतीकडे चालल्याचे दिसते. सरकारी आदेशाने के वळ औपचारिकता म्हणून जन्म-मृत्यूशी निगडीत सुरक्षिततेची बाब पहाता कामा नये. वाहन खरेदी करण्याची क्षमता जितकी महत्त्वाची ठरते तितकी आपली योग्यता आहे काय याचा विचार वाहनचालकांना करावा लागेल. त्यादृष्टीने पोलिसांनी प्रत्येक वाहनचालकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करुन देण्याचे काम या अभियानात व्हावे ही अपेक्षा आहे. स्वतःचा जीव जितका मौल्यवान आहे तितका रस्त्यावर वाहन चालवणाऱ्या अन्य नागरिकांचाही महत्त्वाचा असतो. अगदी पादचाऱ्यांचाही ! परंतु वाहन हाती आले म्हणजे जणू आपण जगज्जेते झालो हा स्वार्थी आणि तितकाच बेजबाबदार भाव चालकांच्या मनात निर्माण होणार नाही याचे समुपदेशन करण्याची व्यापक मोहीम हाती घेण्याची गरज आहे. दंडात्मक कारवाईने ‘लक्ष्य’ पूर्ती होईल पण सुरक्षिततेबाबत लक्षवेधक काम झाले असे म्हणता येणार नाही. या समुपदेशन कार्यात ज्येष्ठ नागरिक, निवृत्त शिक्षक
आणि संवादकौशल्यात गती असणाऱ्या नागरिकांची मदत घेतली गेली तर वाहतूक पोलिसांवरचा ताण कमी होऊ शके ल. वाहनचालकांची मानसिकता स्वार्थी आणि संकुचित होत चालली असून अपघातांच्या वाढीत तो महत्वाचा घटक बनत चालला आहे. ही मानसिक कोंडी फु टली तर सुरक्षिततेचे ध्ये साध्य होऊ शके ल. समजुतदारपणा आणि सहिष्णुता यांची सर्वाधिक गरज आहे. ती वाढवण्यासाठी या अभियानाने प्रयत्न करावा.