आयुर्वेदाच्या हाती भवितव्य

पाच हजार वर्षांची परंपरा आणि तीस हजार कोटी रुपयांची बाजारपेठ असणारे आयुर्वेद मात्र जिथे जन्माला आले त्या भारतापेक्षा नेपाळ आणि भुतानमध्ये अधिक लोकप्रिय असावे याचे आश्चर्य वाटते. आयुर्वेदाचा शास्त्रोक्त अभ्यास, सखोल संशोधन आणि त्याचा प्रत्यक्षात वापराबाबतचे अचुक मार्गदर्शन या बाबींची चरक-संहितेमध्येविस्तृत मांडणी झाली असली तरी आधुनिक जगातील कृत्रिम आणि नव्या बाजारी व्यवस्थेत स्थान मिळाले नाही, हेही खेदाने नमुद करावे लागेल. बहुराष्ट्रीय औषधी कं पन्यांचा रेटा असो की त्यांची आक्रमक विपणन यंत्रणा यांमुळे आयुर्वेदाला हलक्यात घेण्याची समाजाला सवय लागली. हे गैरसमज गेल्या काही वर्षात दर होऊ ला ू गले असून ते सुचिन्ह मानावे लागेल. कोरोना साथीत आयुर्वेदिक उपचारांनी अनेकांचे प्राण वाचवले हे त्याचे उदाहरण! सध्याच्या आयुर्वेदिक उत्पादनांच्या बाजारपेठे चा आवाका मोठा असला तरी त्यात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे आणि ती सर्वोतोपरी या क्षेत्रात कार्यरत असलेले संशोधक, उत्पादक आणि डॉक्टर यांच्या प्रयत्नांवर अवलंबून असणार आहे. या बाबींचा विचार करताना आयुर्वेदाचे अच्छेदिन फार दर नाहीत असेच ू म्हणावे लागेल. आधुनिक काळातील राहणीमान अनेक रोगांना आमंत्रण देत असतात. आज सेवन होणारे अन्न असो वा अगदी श्वास घेतली जाणारी हवा, यामध्ये पूर्वीचा कस राहिलेला नाही, प्रदषणू वाढले आहे. मागणी-पुरवठ्याच्या व्यवस्थापकीय गणितात शरीरात सहाय्यभूत ठरणारी औषधे निर्माण होत नाहीत. आयुर्वेद रोगापेक्षा त्यांच्या मूळावर उपचार करीत असतो. अॅलोपॅथीची औषधे शारीर संरचनेत हस्तक्षेप करीत असल्याचा आयुर्वेदवाल्यांचा आक्षेप आहे तर आयुर्वेद संथ गतीने आणि रोग बरा होईलच अशी शाश्वती देऊ शकत नाही, म्हणून हे शास्त्र अनुकू ल नाही असा प्रत्यारोप होत असतो. झटपट परिणाम हा आजच्या युगाचा मंत्र बनल्यामुळे आणि प्रत्येकाच्या जीवनात वेळेला आलेले अनन्यसाधारण मोल यांमुळे आयुर्वेदाला दय्यम महत्त्व ु दिले जात आहे. आयुर्वेद जनमानसात अधिक लोकप्रिय होण्यासाठी हे गैरसमज दर करण् ू याचे प्रयत्न व्हायला हवेत. सरकारच्या आयुष मंत्रालयाने अलिकडच्या काळात समाजाचा दृष्टीकोन बदलण्यासाठी आयुर्वेद शास्त्राच्या शिक्षणात कालानुरुप बदल के ले. काही शस्त्रक्रिया करण्यासही अनुमती दिली. आयुर्वेद महाविद्यालये सुरु करण्यास प्रोत्साहन दिले. आयुर्वेद डॉक्टरांना समाजात मानाचे स्थान त्यामुळे मिळाले असून नागरीकांनाही या शास्त्राबद्दल खात्री पटल्यामुळे त्याकडे ओढा वाढला आहे. आयुर्वेद हे निरोगीपणावर प्राचीन काळापासूनचे उत्तर होतेच, परंतु ते येणाऱ्या काळातही अधिक परिणामकारक होणार आहे. अर्थात हा विश्वास संपादन करण्यासाठी काही पिढ्यांना चांगली कामगिरी करुन दाखवावी लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आं तरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा पायंडा पाडला. यावरुन त्यांना आपल्या जुन्या शास्त्रांवर, रीतीरिवाजांवर पूर्णविश्वास आहे हे सिध्द होते. त्यांच्या धोरणांमुळे आयुर्वेदाला
वाढण्यासाठी अनुकु ल वातावरणही तयार झाले आहे. हे चित्र या क्षेत्रासाठी दिलासादायक जरुर आहे. परंतु त्याचबरोबर उत्तरदायित्व वाढवणारेही आहे. आयुर्वेदाकडे
शेवटचा पर्याय म्हणून पहाण्याची सवय समाजाने मोडून तोच प्रथम पर्याय म्हणून निवडायला हवा. आधुनिक औषधे शरीरात अतिक्रमण करीत असतात तर आयुर्वेदिक
औषधे विस्कटलेली घडी नीट करीत असतात. मानवी शरीराचा गुंता सोडवण्यासाठी ऋषी-मुनींनी के लेल्या तपश्चर्येचे फळ आयुर्वेद आहे आणि त्याचा प्रसार, प्रचार आणि जनजागृती करण्यासाठी आलेल्या रथाचे म्हणूनच सहर्ष स्वागत करायला हवे.