भाजपा नेत्यांची महाराष्ट्रात होत असलेली प्रचारसभांतील भाषणे पाहिली तर महाआघाडी त्यांच्या 45च्या लक्ष्यात अडसर ठरू शकते, हे जाणवते. वास्तविक कें द्रातील निर्विवाद सत्ता आणि राज्यात दोन वर्षांपूर्वी सत्ता खेचून आणण्याकरिता घडलेले महानाट्य यांचा एकत्रित विचार के ला तर भाजपाला लक्ष्यपूर्ती करणे अवघड जाऊ नये. अर्थात त्यांच्या नेत्यांच्या भाषणांतील टीके चा सूर तरीही टीपेला जात असल्यामुळे इतकी दखल घेतली जाते हा आत्मविश्वास प्रतिस्पर्धी पक्षाच्या पथ्यावर पडू शकतो.
नांदेड येथील सभेत अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली. या नेत्यांचे पक्ष अनुक्रमे नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना आहेत असे ते म्हणाले. हा आक्रमकपणा अप्रत्यक्षपणे असे सूचित करतो की राष्ट्रीय लोकशाही आघाडीत समाविष्ट झालेले पक्ष असली आहेत. मुळात राजकारण इतके गढूळ
झाले आहे की कोण स्वच्छ आणि कोण अस्वच्छ हेच सर्वसामान्य जनतेला समजेनासे झाले आहे. हे अंतर धूसर झाल्यामुळे मतदार संभ्रमावस्थेत आहे. त्याला आपल्याकडे वळवणे हे प्रचाराचे मुख्य उद्दिष्ट असले तरी प्रचारातील भाषा किती आक्रमक असावी यावर मतदाराची निर्णयप्रक्रिया ठरत असते. नेत्याच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द प्रमाण मानण्याचे दिवस पूर्वीच संपले. नेता किती पाण्यात आहे, त्याचा पूर्व इतिहास, त्याच्या सामाजिक जाणीवा, त्याचे हेतू, स्वार्थ इत्यादी-इत्यादी न समजण्याइतकी जनता खुळी राहिलेली नाही. त्यामुळे कोणता पक्ष असली वा नकली असतो हे त्यांचे ते ठरवत असतात. भाजपाने 400 च्या वर जागांचे लक्ष्य जाहीर
के ल्यापासून ते स्वत:च बनवलेल्या सापळ्यात अडकले आहेत. हा आकडा पार करायचा तर आक्रमक प्रचार अपरिहार्य बनतो. परंतु हा आक्रमकपणा फाजिल आत्मविश्वासात रुपांतरितझाला तर बूमरँग होऊ शकतो. शरद-पवार आणि उद्धव ठाकरे हे सहानुभूतीवर अवलंबून आहेत, कारण दोघांचे पक्ष फोडले गेले आहेत. ही वेळ अशी आहे की जी आपत्ती त्यांच्यावर आली आहे ती त्यांच्या चुकीमुळे झाली आहे की त्यांना सोडून गेलेल्या लोकांवर अन्याय झाला या भावनेवर बेतलेली आहे. आपत्तीस भले पवार-उद्धव जबाबदार असले तर मतदार म्हणणार त्यांना त्याची शिक्षा मिळाली आहे आणि आता त्यांना शिक्षा द्यायची की प्रशस्तीपत्रक, ते आम्ही ठरवू. या निर्णय-प्रक्रियेत असली-नकलीचा मुद्दा महत्वाचा जरुर ठरतो. पण ते प्रचारकी भाषणावरुन ठरवता येणार नाही, असे मतदारांना वाटत आहे. महाराष्ट्राने दोन वर्षात खूप राजकीय चिखलफे क पाहिली. मतदार त्यास विटले आहेत. आता आणखी चिखल ते सहन करण्याच्या मन:स्थितीत नाहीत.