आयाराम गया ‘राम – राज्य’!

गोव्यातील राजकीय घडामोडी पहात राजकारण किती तकलुबी झाले आहे याचा पुन:प्रत्यय जनतेला आला. महाराष्ट्रातील राजकीय रंगमंचावरील पडदा पडत असताना गोव्यात आणखी एका नाट्याची सुरुवात झाली आहे. राज्यात शिवसेनेचे 40 आमदार बाहेर पडले आणि मूळ पक्षात 15 राहिले तसेच काँग्रेसचे गोव्यात झाले आहे. एका राष्ट्रीय पक्षाला आपले आमदार काबुत ठेवता येऊ नये यापेक्षा दसरे ु दर्ुदैव नाही. पक्षाचे नेतृत्व पुन्हा एकदा टीके चे लक्ष्य बनणार आहे.

चाळीस आमदार-संख्या असलेल्या छोटेखानी राज्यात काँग्रेसचे 11 पैकी सहा आमदार भाजपात डेरेदाखल झाले आहे. पक्षांतरविरोधी कायद्याखाली कारवाई होऊ नये याकरिता आठ आमदार बाहेर पडणे आवश्यक आहे. भाजपाची व्यूहरचना आणि आक्रमकपणा पाहता ही बाब अशक्य नाही. हे ताज्या उदाहरणावरून दिसते. अशी फोडाफोड करणे योग्य की अयोग्य हा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे निर्माण होणाऱ्या अस्थिरतेमुळे विकासाचा बळी जातो आणि त्याची झळ जनतेला बसते याचाही विचार करण्याचे दिवस प्रचलित राजकारणातून हद्दपार झाले आहेत. पक्षाचे आमदार बांधून ठेवण्याचे काम वरिष्ठ नेत्यांनी करायचे असते. परंतु गोव्यातील या नेत्यांनी हे काम
देवाला ‘आऊटसोर्स’ के ले! निवडून आल्यावर याच आमदारांना देवळात आणि चर्चमध्ये नेऊन भाजपात जाणार नाही अशी शपथ घेण्यास म्हणे भाग पाडण्यात आले होते! तेही प्रतिज्ञापत्रावर!! अर्थात सेक्युलर राज्यव्यवस्थेत देवाचा ‘रोल लिमिटेड’ असल्यामुळे आणि देवाशी खोटे बोललो म्हणून शिक्षा होत नसते याची हमी असल्यामुळे आमदारांनी चक्क शब्द फिरवला आणि पक्षांतर करुन मोकळे झाले. असे वागणे मतदारांशी प्रतारणा करण्यासारखे आहे अशा चर्चा आदर्शवादी मंडळी करीत बसतील. परंतु देवाला दिलेला शब्द फिरवला जाऊ शकतो तिथे मतदारांना कोण विचारणार. असो महाराष्ट्रातील राजकारणाचे वारे गोवा-किनारी पोहोचले आहेत, हे खरे.
मतदारांना दिलेला शब्द महत्वाचा की देवाला  प्रतिज्ञापत्रावर लिहून दिलेले आश्वासन असे फिजुल राजकारण होत नसते. मुळात देवाला खुर्चीची अभिलाषा नसते, पण ती मिळावी म्हणून देवाला बिचाऱ्याला पाण्यात बुडवून ठेवले जाते. भारतीय राजकारणाची विटंबना अशी किती दिवस चालणार हे कळायला मार्ग नाही. परंतु सत्तेचा मोह जोवर सुटणे थांबत नाही तोपर्यंत आयाराम-गयाराम सिलसिला सुरूच राहणार. त्यालाच राम-राज्य म्हणायचे आणि पुढच्या निवडणुकीत मतदानाला तयार व्हायचे. शेवटी
काही के ले तरी लोकशाही जिवंत राहायला नको का?

अगदी कशीही असली म्हणून काय झाले. गोव्यातील राजकीय अवकाशात उच्च दाब निर्माण झाला आहे. मुसळधार सरी कोसळत असताना काजूफेणीचे घोट घेत गोवेकर राजकारणावर चर्चा करीत राहणार. वृत्तवाहिन्या आणि माध्यमवाले कोणत्या देवाची पूजा करतात कोणास ठाऊक? त्यांच्यावर तो प्रसन्न दिसतो हे नक्की !!