राजकारणात भापवण्याला खूप महत्व आले आहे. सध्याचे युग ‘मार्के टिंग’चे असल्याने राजकारणासारखे क्षेत्र त्यापासून अलिप्त राहू शकत नाही. इं ग्रजीत ‘लार्जर दॅन लाईफ’ अर्थात प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर असल्याचा भास निर्माण करण्याकडे स्वाभाविक ओढा असतो. ही अहमहमिका नेत्यांच्या जाहिरात फलकांतून जशी दिसते तशी ते आयोजित असलेल्या कार्यक्रमांतूनही समोर येत असते. अशावेळी पक्षांची कार्यालये भव्यतेच्या शर्यतीत मागे कशी रहातील? ठाण्यात नव्याने सुरु झालेल्या भाजपा कार्यालयाची सध्या खूप चर्चा आहे आणि असे कार्यालय पक्ष कधी उभारेल हे ज्या जुन्या ठाणेकरांनी शिवाजी पथावरील नाईकवाडीतील कार्यालय पाहिले असेल त्यांना अविश्वसनीय वाटले तर आश्चर्य वाटू नये! भाजपाने ठाण्यासारख्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात इतके प्रचंड कार्यालय उभे करणे हे म्हणजे पक्ष ठाण्याकडे भविष्यात कसे पहात आहे याचे द्योतक आहे. संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बोलबाला असून या लोकसभा निवडणुकीत 400च्या वर जागा मिळवण्याचा एल्गार 400 चौ. फूट जागेतून नक्कीच सुसंगत ठरला नसता. त्यावर जनतेनेही विश्वास ठे वला नसता. पक्ष निर्विवाद मोठा आहे, हे सरकारच्या कामावरुन एकीकडे सिद्ध के ले जात असताना
जनमानसात पक्षाबद्दल जनतेच्या मनात आस्था, आशा आणि विश्वास तयार होणे तितके च गरजेचे आहे. भाजपा हा ब्रॅण्ड आहे आणि मोदी त्याचे ‘प्रॉडक्ट’ हे लक्षात घेतले तर पक्षाचे कार्यालयही त्या तोडीचे असायला हवे हे व्यवस्थापन शास्त्रातील सिद्धांत वापरण्यात आलेला दिसतो. ठाण्यात कोणत्याच, अगदी शिवसेनेचेही, कार्यालय इतके मोठे नाही, यावर जनमानसात चर्चा घडू लागली तर तोही मार्के टिंगचा भाग समजायला हवा. गंमत म्हणजे गेल्या काही वर्षात अन्य पक्षांचे नेते स्वत:चे बंगले बांधण्यात मश्गुल असताना भाजपा नेत्यांनी पक्ष कार्यालयावर भर देऊन आगामी काळ जणू आपलाच आहे हे दाखवून देण्याचा तर प्रयत्न के ला नसावा? भाजपाला भव्यतेचा जणू ध्यास लागला असावा. असे वाटते. नवी दिल्लीत संसदेची पुनर्रचना असो की, ‘कर्तव्य पथ’ची नवनिर्मिती, यावरुन मुंबईच्या वेशीवर असलेल्या ठाण्यात भव्य वास्तूनिर्माण करण्याची प्रेरणा मिळाली असेल तर वावगे नाही. प्रश्न अनेक आहेत की अशा मोठ्या वास्तू छोट्या माणसाला न्याय मिळणार आहे का? त्याच्या अपेक्षांची पुर्तता होणार आहे का? मोठ्या वास्तूचा उपयोग के वळ भपका निर्माण करण्यासाठी तर होणार नाही ना? शिवसेनेच्या मोठ्या भावाची प्रतिमा मोठे कार्यालय थाटून कायमची पुसण्याचा तर हेतू नसावा? की ठाणे खरोखरीच देशाच्या विकासाच्या दृष्टीने एक मोठे कें द्र आहे आणि त्याला साजेसे पक्षीय कार्यालय देण्याचा प्रांजळ हेतू आहे? तुर्तास मोठे कार्यालय ऐन निवडणुकीच्या हंगामात उभारुन भाजपाने ठाण्याच्या जागेवर आपला दावा बळकट के ल्याची चर्चा आहे. भाजपाला ठाण्याची जागा मिळाली तर नूतन वास्तू लाभली असेही त्यांना म्हणता येईल.